आता ड्रोनने होणार खाद्यपदार्थांची डिलेवरी

ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवण्याच्या जमान्यात आता हे खाद्य पदार्थ ड्रोनच्या सहाय्याने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची कार्य प्रणाली प्रत्यक्षात शक्य झाली आहे.

dron
दोनच्या सहाय्याने खाद्यपदार्थांची डिलेवरी

जगातील पहिल्या ड्रोनच्या सहाय्याने खाद्य पदार्थांची डिलेवरी करण्याचा व्यवसायायाल मंजुरी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील गुगलच्या ऑफ शुट या कंपनीने सदर प्रोजेक्टची (ड्रोनद्वारे खाद्य पदार्थ पोहोचवणे) संकल्पना आणली आहे. मागील १८ महिन्यांपासून गुगलच्या ऑफ शुट या कंपनीकडून ड्रोनच्या साहाय्याने कॉफी,चॉकलेट, खाद्यपदार्थ तसेच काही पेय हे ड्रोनच्या सहाय्याने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. दरम्यान, अशा प्रकारे ड्रोनच्या सहाय्याने खाद्यपदार्थ पोहोचवण्याच्या प्रकल्पाला अखेर अधिकृत परवानगी मिळाली असून त्याच्या कॉन्ट्रक्टर मंगळवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

प्रायोगिक तत्वावर खाद्य पदार्थांची डिलीवरी करणारे ड्रोन, वाहतुक व्यवस्थापन, त्यांचा मेंटेनंस, ड्रोन चालवणारा पायलट, तसेच पर्यायी व्यवस्था याची पडताळणी (हवाई विमान वाहतुक सुरक्षा यंत्रणा विभाग) कासा यांच्याकडून करण्यात आली असून त्यानंतरच, अशा प्रकारे ड्रोनच्या सहाय्याने खाद्य पदार्थ डिलेवरीला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती कासाच्या पीटर गिब्सन यांनी दिली आहे.

हे असतील नियम

दरम्यान, ड्रोनद्वारे खाद्यपदार्थ डिलीवरीला परवानगी देण्यात आली असली, तरी प्रमुख रस्ते ओलांडण्यास ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डिलेवरी सेंटरपासून काही ठराविक अतंरापर्यंतच ड्रोनद्वारे डिलीवरी केली जाऊ शकते.

आवाजाची समस्या

ड्रोन उडवल्यानंतर होणाऱ्या अवाजामुळे उंचावर असणाऱ्या घरांच्या इमारतींच्या काचांमधून हा आवाज घरात जाऊन लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे राजधानी कॅनबेरातील क्रोस, पामरस्टन, फॅंकलिन शहारातील १०० घरांपासून या डिलेवरीला सुरवात करण्यात येणार आहे.

एका वेळी अनेक डिलेवरी

ड्रोनच्या सहाय्याने एका वेळी अनेक डिलेवऱ्या ग्राहाकांना देणे शक्य होणार आहे. कंपनीच्या अंदाजानूसार ड्रोन डिलेवरीमुळे कंपनीच्या नफ्यात ३० ते ४० लाख डॉलरने वाढू शकतो.