Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग यासाठीच थायलंडच्या राजाच्या गर्लफ्रेंडचे हजारो न्यूड फोटो झाले व्हायरल

यासाठीच थायलंडच्या राजाच्या गर्लफ्रेंडचे हजारो न्यूड फोटो झाले व्हायरल

थायलंडच्या राजाची गर्लफ्रेंड नुकतीच जेलमधून बाहेर आली होती.

Related Story

- Advertisement -

थायलंडचा राजाची पत्नी आणि गर्लफ्रेंडमधील चालू असलेला वाद आता आणखी चिघळणार आहे. याप्रकरणात आता नवीन प्रकरण समोर उभे राहिले आहे. दरम्यान थायलंडचा राजा महा वजीरालोंगकोर्न यांच्या गर्लफ्रेंडचे १४०० हून अधिक फोटो लीक झाले आहेत. यामध्ये शेकडो फोटो हे न्यूड आहेत. हे जाणूनबुजून केले असल्याचे काही लोकं म्हणत आहेत. फोटो लीक होण्यामागचे कारण राजाची पत्नी आणि त्यांची गर्लफ्रेंडमधील वाद आहे.

राजाच्या गर्लफ्रेंडचे फोटो लीक झाल्यानंतर आता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पण अद्याप या प्रकरणावर राजाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. नुकतीच राजाची गर्लफ्रेंड सीनीत जेलमधून बाहेर आली आहे. सीनीतला गेल्या वर्षी थायलंडच्या जेलमध्ये बंद केले गेले होते. माहितीनुसार, सीनीत जेलमधून बाहेर आल्यानंतर राजा आणि तिच्यात अजून जवळीक वाढली होती. ज्यामुळे राजाची पत्नी नाराज झाली होती. राजा आणि गर्लफ्रेंडमधील वाढणारी जवळीक राजाच्या पत्नीला अजिबात आवडत नव्हती. याच मुद्द्यावर राजा आणि राणीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.

- Advertisement -

२०१९ साली राजाच्या गर्लफ्रेंडला जेलमध्ये जावे लागले होते. गर्लफ्रेंड सीनीतवर राणी सुथिडा यांची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला होता. माहितीनुसार, गर्लफ्रेंड सीनीतचे लीक झालेले फोटो २०१२ पासून ते २०१४ पर्यंतचे आहेत. दरम्यान थायलंडच्या राजाचे चार लग्न झाले आहेत. यापैकी तीन पत्नींशी घटस्फोट झाला आहे. राणी सुथिडा राजाची चौथी पत्नी आहे. राजाने राणी सुथिडासोबत २०१९ साली लग्न केले होते. राजाला एकूण ७ मुलं आहेत.


हेही वाचा – अहो आश्चर्य! समुद्रात चालतो हा मासा; बघा व्हिडिओ


- Advertisement -

 

- Advertisement -