अरे बापरे! जंगलात 6 सिंहांसोबत फिरतेय तरुणी; VIDEO पाहून नेटकरी थक्क

सोशल मिडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी जीवावर बेतणाऱ्या गोष्टी करणारेही नग पाहायला मिळतात. सध्या अशाचप्रकारचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. एक तरुणी एका जंगलाच चक्क 6 सिंहिणींसोबत फिरताना पाहायला मिळत आहे. खरंतर वाघ ,सिंह असे जंगली प्राणी पाहिले तर, कोणात्याही व्यक्तीच्या छातीत धडधडणे साहजिकच आहे.

A young woman wandering in the forest with 6 lions; Netflix shocked watching VIDEO
अरे बापरे! जंगलात 6 सिंहांसोबत फिरतेय तरुणी; VIDEO पाहून नेटकरी थक्क

सोशलमिडिया म्हटलं की, व्हायरल गोष्टींची चर्चा तर होणारच. त्यात या सोशलमिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची नजर पाहायला मिळते. त्यात सोशल मिडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी जीवावर बेतणाऱ्या गोष्टी करणारेही नग पाहायला मिळतात. सध्या अशाचप्रकारचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. एक तरुणी एका जंगलाच चक्क 6 सिंहिणींसोबत फिरताना पाहायला मिळत आहे. खरंतर वाघ ,सिंह असे जंगली प्राणी पाहिले तर, कोणात्याही व्यक्तीच्या छातीत धडधडणे साहजिकच आहे. मात्र, ही तरुणी या व्हिडीओमध्ये 6 सिंहिणींसोबत अशाप्रकारे फिरत आहे,जणू काही ते पाळीव प्राणीच आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SAFARI GALLERY 🦁 (@safarigallery)

काही सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ जंगलात शूट केला असून, आश्चर्यकारक बाब म्हणजे या दरम्यान, या 6 सिंहिणींसोबत आरामात फिरत असून, एकाही सिंहिणीने महिलेवर हल्ला करत नाही. याशिवाय महिलेच्या चेहऱ्यावर भीतीचे जराही भाव दिसत नाही.हा थक्क करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर safarigallery नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

सफारी गॅलरीने सांगितलं की, सिंह याअगोदर आफ्रिका, आशिया आणि यूरोपात आढळत होता. मात्र आता केव्हातरीच आफ्रिकेत हे सिंह आढळतात. याशिवाय आशियाई सिंह भारतात सासन-गिर नॅशनल पार्कमध्ये दिसतात.


हेही वाचा –  Viral Video : ‘पुष्पा’च्या ‘सामी सामी’ गाण्यावर स्पायडरमॅनचे ठुमके