Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग ईदनिमित्त पाकिस्तानी पत्रकाराने घेतली म्हशीची मुलाखत! पहा व्हिडिओ

ईदनिमित्त पाकिस्तानी पत्रकाराने घेतली म्हशीची मुलाखत! पहा व्हिडिओ

Related Story

- Advertisement -

सोशल मीडिया असं एक माध्यम आहे. ज्यावर काहीही शेअर केल्यास अवघ्या काही क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकते. सोशल मीडियावर असेच काहीसे व्हिडिओ नेहमीच चांगलेच चर्चेत राहत असून व्हायरलही तितक्याच मोठ्या प्रमाणात होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक पाकिस्तानी पत्रकार चक्क म्हशीची मुलाखत घेताना दिसतोय. हा पत्रकार दुसरा तिसरा कोणीही नसून प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार अमीन हफीज हे आहेत. पत्रकार अमीन हफीज प्राण्यांच्या मुलाखतीमुळे नेहमीच चर्चेत असतात.

असा आहे व्हायरल व्हिडिओ

ईदनिमित्त हफीज यांनी एका म्हशीची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचे खास वैशिष्ट म्हणजे पत्रकार हफीज यांच्या प्रश्नांना चक्क म्हशीने पण उत्तरे दिली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. नायला इनायतने ही व्हिडिओची क्लिप ट्विटरवर शेअर केली असून नेटकऱी आता त्याला चांगलेच व्हायरल करताना दिसताय. या व्हिडिओमध्ये, पत्रकार हाफीज म्हशीसमोर माइक घेऊन विचारत आहे की, तुला लाहोरला येताना कसे वाटले. हाफीज यांच्या या प्रश्नाला म्हशीने देखील उत्तर दिले.

- Advertisement -

हाफीज म्हशीला दुसरा एक प्रश्न विचारतात की, लाहोरचे खाणे चांगले आहे की, तुमच्या गावाकडचे…या प्रश्नालाही म्हशीने उत्तर दिले आहे. जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. आपल्या प्रश्नाला म्हैस उत्तर देत आहे. हे बघून हाफीज अतिशय आनंदी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी कमेंट करताना दिसताय. आतापर्यंत ८ हजाराहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिला असून मोठ्या संख्येने लोकं हा व्हिडिओ शेअर करत आहेत. यासह लोक कमेंट करून पत्रकार हाफिजला ट्रोल देखील करताना दिसताय.

बघा व्हिडिओ

- Advertisement -