घरट्रेंडिंगआजच्याचं दिवशी कृत्तक प्रक्रियेद्वारे 'डॉली' मेंढीचा झाला होता जन्म

आजच्याचं दिवशी कृत्तक प्रक्रियेद्वारे ‘डॉली’ मेंढीचा झाला होता जन्म

Subscribe

जगाच्या इतिहासात 22 फेब्रुवारी 1996 या दिवसालाकडे एक मोठी घटना म्हणून पाहिलं जातं. 1996 साली आयन विल्मट आणि त्याच्या सहकार्यांने कृत्तक प्रक्रियेने मेंढीला जन्म दिला. प्रौढ सस्तन प्राण्यांच्या दाता पेशीपासून निर्माण केलेला हा पहिला कृत्तक सस्तन प्राणी होता. विल्मट आणि सहकार्यांनी या मेंढीला ‘डॉली’ हे नाव दिले. खरंतर डॉलीचा जन्म 5 जुलै 1996 या दिवशी झाला होता, पण याची घोषणा मात्र सात महिन्यांनंतर करण्यात आली होती.

फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे झाला होता डॉलीचा मृत्यू

2001च्या सुरुवातीपासून डॉली आजारी पडू लागली, हळूहळू तिची प्रकृती खराब होऊ लागली. 14 फेब्रुवारी 2003 रोजी डॉलीला औषधांचा ओवरडोस देऊन मारण्यात आलं. जेव्हा डॉली जन्माला आली, तेव्हा ती 11-12 वर्ष जगेल अशी आशा होती. पण त्यानंतर डॉली सात वर्ष जीवंत राहिली आणि फेब्रुवारी 2003 मध्ये मरण पावली. मृत्यूनंतर जेव्हा तिचं पोस्टमार्टम केलं गेलं, तेव्हा तिला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता हे समजलं. तिच्या मृत शरीराला स्कॉटलँडच्या संग्रहालयात ठेवण्यात आलं आहे.

- Advertisement -

डॉलीनंतर वेगवेगळ्या देशातील वैज्ञानिकांनी याच तंत्राचा वापर करून उंदीर, मांजर, गुरे आणि अन्य सस्तन प्राण्यांनी कृत्तके तयार केली.


हेही वाचा – भारतातील ‘ही’ दोन शहरे ‘पवित्र क्षेत्र’ म्हणून घोषित; येथे मांस आणि दारू विक्रीवर बंदी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -