घरट्रेंडिंगParag Agrawal : Twitter चे CEO पराग अग्रवाल JEE परीक्षेत थेट पर्यवेक्षकांशी...

Parag Agrawal : Twitter चे CEO पराग अग्रवाल JEE परीक्षेत थेट पर्यवेक्षकांशी भिडले होते

Subscribe

पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी देताना हे टॅलेंट एकट्या जॅक डॉर्सी यांनी ओळखले नव्हते. तर परागला शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांनी त्यांच्यातील हा गुण आधीच ओळखला होता. त्यांच्या शिक्षकांनी एका परीक्षेच्या दरम्यानचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार परीक्षेच्या काळातील पराग अग्रवाल यांची एका छोट्याश्या कृतीतून ही हुशारी आणि चुणुकपणा दिसून आला होता. JEE परीक्षेतील एक अनुभव पराग अग्रवाल यांच्या शिक्षकांनी शेअर केला आहे. (Parag agarwal regretted for wasting time during iit jee supplements exam)

वेळ वाया गेल्याने संताप 

पराग अग्रवाल यांनी JEE परीक्षेत आपल्याला येणारी उत्तरे ही सुरूवातीच्या ४० मिनिटांमध्ये सोडवली. त्यानंतर अतिरिक्त पुरवणीसाठीची मागणी केली. पण त्याठिकाणी उपस्थित पर्यवेक्षकांनी अतिरिक्त पुरवणी देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगितले. पण पर्यवेक्षकांच्या उत्तराने समाधान न झाल्याने ते पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले. पुन्हा एकदा सर्व सूचना बारकाईने वाचल्या. त्यामध्ये सर्व पुरवण्या या योग्य क्रमात बांधा अशी सूचना देण्यात आली होती. हीच सूचना वाचून ते पुन्हा पर्यवेक्षकांकडे गेले. हीच सूचना दाखवत पुन्हा एकदा त्यांनी पुरवणीची मागणी केली. त्यानंतर पुरवणी उपलब्ध करून देण्यात आली. पण दरम्यानच्या काळात खूपच वेळ वाया गेल्याचा मनस्ताप त्यांना झाला. अशा महत्वाच्या परीक्षेत मोलाचा वेळ वाया गेल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांना IIT-JEE परीक्षेत कोचिंग करणारे कोच प्रवीण त्यागी यांनी ही माहिती दिली आहे. IIT-JEE २००० साली ही परीक्षा दिली होती.

- Advertisement -

कुठून घेतले शिक्षण ?

अग्रवाल यांनी ७७ व्या स्थानी आयआयटीच्या ७७ व्या जॉईंट एंट्रस परीक्षेत क्रमांक मिळवला होता. त्यानंतर आयआयटी मुंबईच्या कॉम्प्युटर सायन्स विभागात त्यांनी शिक्षण घेतले. या विभागात दोन कोर्सेस अग्रवास यांनी केले. पण या विभागात टॉपर म्हणून स्थान मिळवल्याचाही अनुभव त्यांचे प्राध्यापक सुप्रतिम बिस्वास यांनी सांगितला. IIT-B येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्टॅण्डफोर्ड युनिवर्सिटी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट पूर्ण केली.

ट्विटरशी कधी जोडले गेले ?

सत्या नडेला आणि सुंदर पिचई यांच्या अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या मोठ्या हुद्द्यावरील नेमणुकीनंतर आता या रांगेतच पराग अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. ट्विटरमधील सर्वाधिक महत्वाचा असा रोल डॉर्सी यांनी अग्रवाल यांच्याकडे सोपावला आहे. अग्रवाल हे याआधी मायक्रोसॉफ्ट, याहू आणि एटी एण्ड टी लॅब्समध्ये संशोधक म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०११ साली ट्विटर सॉफ्टव्हेअर इंजिनिअर म्हणून जॉईन केले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांच्याकडे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून जबाबदारी आली. परिणामी ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा परिणाम दिसून आला. जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात छाप सोडणाऱ्या भारतीय वंशांच्या तरूणांमध्ये आता ट्विटरच्या सीईओ पदावर अग्रवाल यांच्या नावानेही शिक्कामोर्तब झाले आहे. ट्विटरच्या निमित्ताने गेल्या काही वर्षात खूपच वादविवाद समोर आले आहेत. त्यामुळेच जगभरातील देशांमध्ये अनेक सरकार आणि शासनाची नाराजी ट्विटरने गेल्या काही काळात ओढावून घेतली आहे.

- Advertisement -

कसे आहे कौटुंबिक आयुष्य ?

पराग अग्रवाल हे डॉर्सी यांची फर्स्ट चॉईस होते. आपल्या कंपनीला खूपच खोलवर समजून घेणारी आणि कंपनीच्या गरजा ओळखून काम करणारी व्यक्ती म्हणून पराग अग्रवाल यांची निवड झाली आहे. अग्रवाल यांची आई शिक्षिका आणि वडिल अणुऊर्जा विभागात कार्यरत होते. मुंबईतल्या अॅटोमिक एनर्जी स्कूलमधून पराग अग्रवाल यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आपल्या शिक्षणानंतर अग्रवाल यांनी स्टॅण्डफोर्ड मेडिसिनच्या फिजिशिअन आणि क्लिनिकल प्रोफेसर असलेल्या विनिता अगरवाला यांच्याशी लग्न केले. त्यांना अंश नावाचा एक मुलगा आहे, असे विनिता अग्रवाल यांनी ट्विटर प्रोफाईल सांगते. विनिता अगरवाला यांनी स्टॅण्डफोर्ड विद्यापिठातून बायोफिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर एमडी आणि पीएचडी अशा पदव्या हार्वर्ड आणि एमआयटी येथून मिळवल्या. सध्या त्या एड्रीसीन होरोविट्झ येथे जनरल पार्टनर आहेत.

पराग अग्रवाल यांचे पहिले ट्विट

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -