Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग बायकोसोबत भांडण झाल्यावर नवरा असे काही करतो जे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बायकोसोबत भांडण झाल्यावर नवरा असे काही करतो जे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

'मी ही शिकत आहे. जेवल्यानंतर बायकोसी बोलण्यासाठी', असे म्हणतं गोयंका यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Related Story

- Advertisement -

नवरा बायकोची भांडणे प्रत्येक घरात होत असतात. कोणी बायकोची बोलणी मुकाट्याने ऐकून घेत तर कोणी नाही. बायकोच्या भांडणावर काहीतर जालीम उपाय प्रत्येक नवरा शोधत असतो. मात्र प्रत्येकालाच त्यावर उत्तम उपाय मिळेल असे नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून प्रत्येक नवऱ्याला असे वाटेल की आपल्यालाही असे करत आले पाहिजे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून जगातील सर्व पुरुष आपल्या बायकोला घाबरतात हे सर्वच मान्य करतील. बायको आपल्या नवऱ्याशी भांडल्यानंतर नवरा आपले कान एका विशिष्ट पद्धतीने बंद करताना दिसत आहे. ‘मी ही शिकत आहे. जेवल्यानंतर बायकोसी बोलण्यासाठी’, असे म्हणतं गोयंका यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

एक तरुण आपले कान जबरदस्त पद्धतीने बंद करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बायकोने नवऱ्यासोबत भांडायला सुरुवात केल्यावर असेच कान बंद व्हायला पाहिजेत म्हणजे बायको कितीही मोठ्याने भांडली तरी काही फरक पडणार नाही असे म्हणत हजारो नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याची बायको त्याच्यासोबत मोठ्याने भांडत आहे म्हणून त्याने कान बंद केले आहे, असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. व्हिडिओला ५ लाखांहून अधिक व्यूव्ह्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. सर तुम्ही आज उपाशी रहाल, तुमची बायको बहुतेक ट्विटर वापरत नाही अशा कमेंट युझर्सनी केल्या आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – उत्तर प्रदेशात चाट दुकानदार झाला ‘आईन्स्टाईन’, व्हिडिओ तुफान व्हायरल

- Advertisement -