घरट्रेंडिंगबिहारचे बाबा जटाधारी!

बिहारचे बाबा जटाधारी!

Subscribe

बाबा आपल्या जटांची इतकी निगा राखतात की, त्यांच्याकडे बघताचक्षणी आश्चर्याने लोकांच्या नकळत तोंडात बोटे जातात. त्यांच्या जटा एवढी लांब आहे की, बाबा जटा उघड्या ठेऊन चालूही शकणार नाहीत. त्यांच्या उंचीपेक्षा त्यांच्या जटांची लांबी जास्त आहे! त्यांच्या जटांची लांबी सात फूट इतकी आहे.

एखाद्या माणसाची आवडनिवड इतक्या प्रसिद्धीच्या झोतात येते की, त्याची आवडच त्याची ओळख बनते. ही गोष्ट आहे बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील ढंगडा गावाच्या अवलियाची. या अवलियाचे नाव सकलदेव टूड्डू असे आहे. सकलदेवला त्याच्या गावातले आणि आजूबाजूच्या गावातील लोक जटावाले बाबा म्हणूनही ओळखतात. साधारणत: ५६ वर्षीय या बाबाच्या जटा अतिशय विस्मयकारक आहेत!

स्वत:च्या उंचीपेक्षाही लांब जटा

बाबा आपल्या जटांची इतकी निगा राखतात की, त्यांच्याकडे बघताचक्षणी आश्चर्याने लोकांच्या नकळत तोंडात बोटे जातात. त्यांच्या जटा एवढी लांब आहे की, बाबा जटा उघड्या ठेऊन चालूही शकणार नाहीत. त्यांच्या उंचीपेक्षा त्यांच्या जटांची लांबी जास्त आहे! त्यांच्या जटांची लांबी सात फूट इतकी आहे.

- Advertisement -

म्हणून वाढवल्या जटा…

सकलदेव टुड्डू यांना लहानपणापासून केस लांब ठेवण्याची आवड होती. आज त्यांच्या याच आवडीचे रुपांतर त्यांची ओळख म्हणून झाले आहे. सकलदेव यांना लहानपणापासून लांब केसांचा मोह होता, शिवाय नियतीलाही हीच गोष्ट मान्य होती. त्यामुळेच २२ व्या वर्षी त्यांच्या केसांचे रुपांतर जटांमध्ये झाले. सकलदेव यांनी २२ वर्षांचे असताना केस कापण्यास दिरंगाई केली. एक दिवस सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांच्या केसांचे रुपांतर जटांमध्ये झाले असल्याचे त्यांना जाणवले. सकलदेवच्या केसांची जटा झाल्याची बातमी गावातील आणि आजूबाजूच्या लोकांना कळू लागली, तसतसे लोक चमत्कार समजून सकलदेवच्या जटांना पाहण्यासाठी गर्दी करु लागले. या जटांच्या बाबतीत एवढी श्रद्धा वाढली की, लोकांनी सकलदेव यांना जटा न कापण्याचा सल्ला दिला आणि सकलदेव यांनी जटा वाढवायला सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -