Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग पेट्रोलच्या किंमतींनी पूर्ण केली शतकीची हौस, नेटकऱ्यांनी पाडला सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

पेट्रोलच्या किंमतींनी पूर्ण केली शतकीची हौस, नेटकऱ्यांनी पाडला सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश,राजस्थान यासारख्या अनेक राज्यात पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी पार करत पेट्रोलचे शतक गाजवले आहे.

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सामान्य नागरिकही या वाढत्या किंमतींनी त्रासले आहेत. पेट्रोलच्या किंमतींनी मात्र आज शंभरी पाठली. सर्वच स्तरातून याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. नेटकऱ्यांनी वाढलेल्या पेट्रोलच्या किंमतीचा चांगलाच राग हा सोशल मीडियावर काढलेला दिसून येत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर सोशल मीडियावर अनेक मिम्स आणि जोक्स शेअर व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश,राजस्थान यासारख्या अनेक राज्यात पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी पार करत पेट्रोलचे शतक गाजवले आहे. या शतकाने नेटकऱ्यांनाही व्यक्त होण्यास भाग पाडले आहे. सचिनच्या शतकी खेळीच्या वेळी नेटकरी सोशल मीडियावर इतके रिअँक्ट झाले नाहीत तितके पेट्रोलने शतक गाठल्यावर करत आहेत. एवढचं नाही ट्विटरवही #Petrol1०० असा हॅशटॅगही सध्या ट्रेडींगमध्ये आहे.


क्रिकेटरपासून राजकीय नेते आणि कलाकार मंडळींपर्यत सर्वच या मिम्समध्ये दिसत आहेत. क्रिकेटर मनोज तिवारीने देखिल पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर त्याचे मत व्यक्त केले आहे. ‘एक पेट्रोलने एक जबरदस्त इनिंग केलीय’,असे म्हणत. तर काँग्रेस नेते शशि थरुर यांनीही एक एक मजेशीर कार्टून शेअर करत ‘रामदेव बाबाच्या सारखं खाली डोक वर पाय करुन उभे राहिले तर पेट्रोलच्या किंमती ६० रुपये प्रति लिटर होईल’, असे म्हणत त्यांनी रामदेव बाबाचे एक मजेशीर कार्टून शेअर केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

#Petrol100 असे हॅशटॅग वापरत नेटकऱ्यांनी अनेक मिम्सचा पाऊस पाडला आहे. या मिम्सच्या माध्यमातून अनेकांनी आपली मतेही व्यक्त केली आहेत. हजारोंच्या संख्येत हे मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


हेही वाचा – अरे व्वा! ‘इथं’ मिळतंय फ्रीमध्ये पेट्रोल पण ‘हे’ करावं लागणार

- Advertisement -