घरट्रेंडिंगभन्नाट बायकोची भन्नाट आयडिया! नवऱ्यालाच बनवलं lady मॉडेल!

भन्नाट बायकोची भन्नाट आयडिया! नवऱ्यालाच बनवलं lady मॉडेल!

Subscribe

दरम्यान सोशल मीडियावर ही महिला चांगलीच व्हायरल झाली असून तिची ही भन्नाट आयडीया नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे

डिजिटलायजेशनच्या युगात जगत असताना सगळं सोपं आणि सोयिस्कर झाले आहे. तसेच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात काहीही घडलं तरी ते काही क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहोचत असतं. एखाद्या गरजू व्यक्तिला आवश्यक मदत हवी असेल तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ली सहज शक्य होते. तर एखादा गंमतीशीर व्हिडिओ असो किंवा घटना देखील तेवढीच व्हायरल होते. मात्र फिलीपाईन्समध्ये असा प्रकार घडला की तो पाहून तुम्ही देखील हैरान व्हाल. फिलीपाईन्समध्ये एका पुरूषासोबत असं काही घडलं की सध्या सोशल मीडिया त्याचीच चर्चा आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर करून अनेक जण आपला जनसंपर्क वाढवत असतात. यासोबतच कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात. फिलीपाईन्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, फिलीपाईन्समधील एक महिला सोशल मीडियाचा वापर करून आपला व्यवसाय करते. मात्र हा व्यवसाय करताना तिने नामी शक्कल लढवली आहे. हा कपड्यांचा व्यवसाय करताना ते कपडे घातल्यानंतर कसे दिसतात हे दाखवण्यासाठी तिने वापरलेली शक्कल पाहून नेटकरी हसून हसून लोट-पोट झालेत.

- Advertisement -

No mannequin ? No problem🙉 Effort is the key mga Sis🤣
Hindi pwedeng walang ambag mga asawa natin no🤣🤣
Hahaha ganto na uso ngayon kung pano Magbenta🤣

Posted by 𝓙𝓸’𝓼 𝓞𝓷𝓵𝓲𝓷𝓮 𝓢𝓱𝓸𝓹𝓹𝓮 on Monday, January 25, 2021

जोस ऑनलाईन शॉपी या नावाच्या तिच्या फेसबुक पेजवर तिने असे फोटो अपलोड केले की सध्या ते जोरदार व्हायरल होतायंत. तिने कपडे घातल्यावर कसे दिसतात हे दाखवण्यासाठी मॅनेक्वीन म्हणजेच लेडी मॉडेल म्हणून झोपलेल्या स्वतःच्या नवऱ्याचा वापर केला. तिचा नवरा गाढ झोपेत असल्याचे पाहून तिने त्याला चक्क महिलांचे कपडे चढवले आणि ते फोटो काढून स्वतःच्या व्यवसायाची प्रसिद्धी केली. दरम्यान सोशल मीडियावर ही महिला चांगलीच व्हायरल झाली असून तिची ही भन्नाट आयडीया नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -