Photo Viral: अमेरिकेच्या रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रपतींना नो एन्ट्री, फुटपाथवर आली जेवण्याची वेळ

Photo shows Brazil's unvaccinated president eating pizza on a sidewalk in NYC
Photo Viral: अमेरिकेच्या रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रपतींना नो एन्ट्री, फुटपाथवर आली जेवण्याची वेळ

संयुक्त राष्ट्र महासभेच्या (United Nation General Assembly) ७६व्या सत्रात सहभाग घेण्यासाठी सर्व देशाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत (America) पोहोचले होते. यादरम्यानचा ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांचा एक फोटो समोर आला आहे. जो सध्या जगभरात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बोल्सोनारो फुटपाथवर उभे राहून पिझ्झा खाताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो न्यूयॉर्कच्या रस्त्यावरील फुटपाथवर पिझ्झा खाताना दिसत आहेत. यामुळे लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, अखेर एखाद्याचे देशाचे राष्ट्राध्यक्ष संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सहभागी होण्यासाठी आले आहेत, त्यांना अशा प्रकारे रस्त्याच्या बाजूला पिझ्झा खाण्यामागची कहानी काय असू शकते?

यामागचे कारण आहे कोरोना. अमेरिकेने हॉटेल/ रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक केले आहे. लसीकरण न झालेल्या लोकांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री मिळत नाही. अशातच राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो आणि त्यांच्या साथीदारांना रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री मिळाली नाही. कारण त्यांच्याकडे लसीकरण पूर्ण झाल्याचे पुरावे नव्हते.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अजूनपर्यंत ब्राझील राष्ट्रपतींनी लस घेतली नाही आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोरोनासोबत लढण्यासाठी त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत आहे. ब्राझीलच्या राष्ट्रपतींच्या शिष्टमंडळात समाविष्ट मंत्र्यांनी रविवारी रात्री न्यूयॉर्कच्या फुटपाथवरील सहकाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये बोल्सोनारो पण पिझ्झा खाताना दिसत आहेत.


हेही वाचा – Good News! भारतात ऑक्टोबरमध्ये येणार J&J कोरोना लसीचा पहिला लॉट