घरट्रेंडिंगजगातील अशी ठिकाणे जिथे.. मरना मना है

जगातील अशी ठिकाणे जिथे.. मरना मना है

Subscribe

मृत्यू ही एक नैसर्गिक घटना आहे. ज्यावर तुमचे किंवा माझे कोणाचेही नियंत्रण असू शकत नाही. मात्र जगात अशी काही ठिकाणं आहेत ज्याठिकाणी लोकांना मरण्यापासून रोखले जातेय. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलेय. जगात अशी काही ठिकाणं आहेत ज्याठिकाणी मरणे बेकायदेशीर आहे. जाणून घेऊ नेमकी ही ठिकाणं कुठे आहेत ज्याठिकाणी मरणे बेकायदेशीर आहे.

लँजारोन, स्पेन

लँजारोन स्पेन
लँजारोन स्पेन

याठिकाणच्या स्थानिक स्मशानभूमीत खूप गर्दी असायची. त्यामुळे ग्रेनाडा प्रांतातील या गावच्या महापौरांनी १९९९ मध्ये मृत्यूवर बंदी घातली होती. काहींनी ही एक राजकीय चाल असल्याचे तर काहींनी हा एक खेळ असल्याचे म्हटले. परंतु ही खरंच एक बंदी होती. याठिकाणी ४००० रहिवाशांना नवीन स्मशानभूमी तयार करण्यासाठी महानगरपालिका परवानगी देत नाही तोपर्यंत जगण्याचा सल्ला देण्यात आला होता.

- Advertisement -

ले लवंडॉ, फ्रान्स

ले लवंडॉ, फ्रान्स
ले लवंडॉ, फ्रान्स

पर्यावरणाच्या वाढत्या चिंतेमुळे नवीन स्मशानभूमी बांधण्यासाठी परवानगी नाकारत येथील महापौरांना २००० मध्ये मृत्यूवर बंदी घालावी लागली. २००० मध्ये कायदा संमत केला, ज्यात लोकांना मरण्यास मनाई करण्यात आली.

इत्सुकुशिमा, जपान

इत्सुकुशिमा, जपान
इत्सुकुशिमा, जपान

शिंटोवादनुसार, जपानी बेट इत्सुकुशिमा हे पवित्र स्थान मानले जाते. १८६८ पर्यंत येथे मरण्याची किंवा जन्म देण्याची परवानगी नव्हती. बेटावर अजूनही स्मशानभूमी किंवा रुग्णालय नाही.

- Advertisement -

लॉन्गइयरब्येन, नॉर्वे

लॉन्गइयरब्येन, नॉर्वे
लॉन्गइयरब्येन, नॉर्वे

लॉन्गइयरब्येन हे नॉर्वेमधील एक लहान शहर आहे. जे कोळसा खाणीसाठी ओळखले जाते. आर्क्टिक सर्कलच्या अगदी जवळ असल्याने हवामानामुळे येथे सामान्यत: थंड तापमान असते. यामुळे पर्माफ्रॉस्ट मृतदेहांचे विघटन होणे कठीण जाते. ज्यामुळे रोग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे येथील नियमानुसार, लाँगेयरबायनमध्ये मरण पावणे आणि दफन करणे हे कायद्याविरोधात आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला की त्याला नॉर्वेपासून लांब नेले जाते. जेथे असा कोणता कायदा अस्तित्वात नाही.

कुग्नॉक्स, फ्रान्स

कुग्नॉक्स फ्रान्स
कुग्नॉक्स फ्रान्स

२००७ मध्ये कुग्नॉक्सच्या महापौरांनी नवीन स्मशानभूमी उभारण्यास परवानगी न दिल्याने येथे मृत्यूवर बंदी लादण्यात आली. या शहराची लोकसंख्या सुमारे १७,००० इतकी आहे. यामुळे काही वर्षांनी स्थानिक स्मशानभूमीचे रुंदीकरण करण्यास परवानगी देण्यात आली.


Rohini Court Blast: दिल्लीच्या रोहिणी कोर्टात स्फोट, दोन कर्मचारी जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -