घरट्रेंडिंग'पबजी' गेमच्या माध्यमातून जिंकले तब्बल ४१ लाख रुपये!

‘पबजी’ गेमच्या माध्यमातून जिंकले तब्बल ४१ लाख रुपये!

Subscribe

सध्या तरुणवर्ग पबजी गेमकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत.

भारतात पबजी गेमचे वेड तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. देशात पबजी गेमसाठी अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. एवढेच नव्हे तर, अनेकांचा चांगला संसारही मोडला गेला आहे. परंतु या दरम्यान भारतातील ४ मुलांनी पबजीच्या गेमच्या स्पर्धेत भाग घेऊन तब्बल ४१ लाख रुपये जिंकले आहेत. भारतात पबजी गेमला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जात आहे. परंतु, या गेमच्या अभावी काही लोकांनी गुन्हेगारीच्या मार्गावर पाऊल ठेवले आहे. यामुळे राज्यात पबजी गेमला बंदी घातली होती.


पबजी गेम निर्माता प्रत्येक वर्षी एक टूर्नामेंट आयोजित करतात. या पबजी टूर्नामेंटमध्ये ४ भारतीय मुलांच्या टीमने ४१ लाख रुपये जिंकले आहेत. या गेमच नाव पबजी मोबाईल क्लब ओपन असे आहे. या ४ भारतीय मुलांच्या टीमने त्यांच्या टीमचे नाव ‘टीम सोल’ असे ठेवले होते. माहितीनुसार, या टीमने ६ सामने खेळले आणि त्यापैकी सर्व सामने जिंकले. बक्षिस म्हणून त्यांना ६० हजार यूएस डॉलर देण्यात आले. एवढेच नव्हे तर, हा गट बर्लिन येथे होणाऱ्या ग्लोबल फाइनलमध्ये भाग घेणार आहेत. बर्लिन येथे विजय मिळवणाऱ्या टीमला १७.४८ कोटींचे बक्षिस मिळणार आहे. बर्लिन येथील फाइनल १४ आणि १५ जून रोजी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -