घरCORONA UPDATEVideo : गच्चीवर खेळत होते पत्ते; ड्रोनमधून आवाज येताच सगळे झाले फत्ते

Video : गच्चीवर खेळत होते पत्ते; ड्रोनमधून आवाज येताच सगळे झाले फत्ते

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात इमारतीच्या गच्चीवर पत्ते खेळत असतना अचानक ड्रोन आल्याने झाली एक पळापळ.

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात घरी राहण्याचे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे. तसेच कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हा एकच उपाय आहे. मात्र, असे असून देखील अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या काळात इमारतीच्या गच्चीवर, मैदानात, चाळींच्या मोकळ्या जागेत ग्रुप करुन असतात. मात्र, आता यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी एक उपाय शोधला आहे.

@saddam600♬ original sound – Aasif pathan

- Advertisement -

लोक इमारतीच्या बाहेर पडत नाहीत, परंतु आता लोक इमारतीच्या गच्चीवर गर्दी करुन लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. मात्र, त्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी अनोखा मार्ग शोधला आहे. आता पोलीस ड्रोन कॅमेऱ्यातून घोळका करुन उभे राहणाऱ्यांवर नजर ठेवणार आहेत.

काय आहे हा व्हिडिओ?

सध्या टिकटॉकवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक इमारतीच्या गच्चीवर पत्ते खेळताना दिसत आहेत. त्याच दरम्यान, इमारतीच्या गच्चीवरुन अचानक पोलिसांचा आवाज येतो की, ‘पोलिसांचा ड्रोन कॅमेरा गच्चीवर पोहोचला आहे. तुम्ही एकत्र घोळका करुन बसला आहात. तुम्ही लोक तुमच्या घरी रहा, जर तुमचा फोटो ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल’.

- Advertisement -

हा व्हिडिओ सद्मम अन्सारी नावाच्या टिकटॉक युजर्सने शेअर केला असून आत्तापर्यंत ८.२ मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच ४ लाखाहून अधिक लाईक्स आणि ८०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.


हेही वाचा – Corona: राज्यात १०७८ कोरोनाबाधित रुग्ण; तर पुण्यात दोघांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -