घरट्रेंडिंगभलतंच काहीतरी! सेक्स न करताच महिला झाली प्रेग्नंट!

भलतंच काहीतरी! सेक्स न करताच महिला झाली प्रेग्नंट!

Subscribe

गेल्या काही दिवासांपूर्वी हवेमुळे गरोदर झाल्याचा महिलेचा दावा केला होता. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. एका इंडोनेशियन महिलेने आपल्याला हवेमुळे गर्भधारणा झाली असल्याचा दावा केला होता. यावेळी तिने असे सांगितले की, कोणत्याच पुरुषासोबत शारिरीक संबंध ठेवले नसताना देखील गरोदर राहिली होती. मात्र या अनोख्या प्रकारानंतर आणखी एक प्रकार समोर आला आहे. यूकेमध्ये राहणारी एक महिला सेक्स न करताच गरोदर राहिल्याचे तिने सांगितले आणि सगळेच चक्रावून गेले.

असा घडला प्रकार

यूकेच्या हॅम्पशायर येथे राहणाऱ्या एका महिलेने आपली धक्कादायक प्रेग्नन्सीची कथा सोशल मीडियावर नेटकऱ्यांसोबत शेअर केली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या निकोलने सांगितले की ८ वर्षांपूर्वी कोणतेही लैंगिक संबंध न ठेवता देखील गरोदर राहिली. हा प्रकार ऐकून सर्वच हैरान झालेत. डेलीमेलच्या अहवालानुसार १८ वर्षांची असताना निकोल तिच्या प्रियकराला डेट करत होती. एके दिवशी निकोल ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक तिच्या छातीत जळजळ होऊ लागली आणि तिला चक्कर देखील आली. यावेळी निकोलला तिच्या मैत्रिणीने गर्भधारणा चाचणी करण्याचा सल्ला दिला होता.

- Advertisement -

निकोलची गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आली. हे समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. निकोलनेचे जरी प्रेमसंबंध असले तरी तिने प्रियकरासोबत कोणतेही लैंगिक संबंध ठेवले नसल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच निकोलने डॉक्टरांचा सल्ला घेतला. गर्भधारणेच्या तपासणी दरम्यान, निकोलला असे आढळले की तिला वेजिनीस्मस नावाचा आजार झाला आहे. या परिस्थितीत, योनीच्या स्नायूंची समस्या निर्माण झाल्याने शारीरिक संबंध ठेवणे अवघड होते. मात्र अशा परिस्थितीत तिला तिच्या गरोदरपणाबद्दल समजले तेव्हा ती हैरान झाली आणि तिला या प्रकाराचे अधिक आश्चर्य वाटले.

दरम्यान, डॉक्टरांनी निकोलच्या प्रकाराबद्दल सांगताना असे सांगितले की, कोणतेही लैंगिक संबंध न ठेवताही शुक्राणू किंवा द्रव एखाद्या प्रकारे योनीत प्रवेश केल्याने गर्भधारणा होऊ शकते. मात्र निकोलच्या बाबतीत झालेला हा प्रकार खूपच दुर्मिळ आहे. निकोल या प्रकाराबद्दल खूप चिंताग्रस्त होती. या आजारातून बाहेर पडण्यासाठी निकोलने एका वेजिनीस्मस थेरेपिस्टची भेट घेतली. वेजिनीस्मस थेरेपिस्टच्या मदतीने निकोल तिच्या मेडिकल कंडिशनमधून बाहेर पडली. या सर्व प्रकारात निकोलच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या प्रियकराने तिला सांभाळून घेतल्याचे तिने सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -