घरट्रेंडिंगपब्जीचे नवे शिवधनुष्य पेलताना तुमच्या नाकीनऊ येणार!

पब्जीचे नवे शिवधनुष्य पेलताना तुमच्या नाकीनऊ येणार!

Subscribe

पब्जीने 0.14.0 असे नवे वर्जन आणले आहे. यामध्ये गेमची क्लॅरीटीत प्रचंड चांगले बदल करण्यात आले आहे. याशिवाय झॉम्बी इनफेक्शनचे जबरदस्त इफेक्ट्स आता अनुभवता येणार आहेत.

जगभरात सर्वाधिक प्रमाणात खेळला जाणाऱ्या पब्जी (प्लेअर अननोन बॅटलँडर) गेममध्ये आता आणखी काही बदल करण्यात आला आहेत. त्यामुळे पब्जी गेम खेळण्यात आणखी मज्जा येणार आहे. पब्जीने 0.14.0 असे नवे वर्जन आणले आहे. यामध्ये गेमची क्लॅरीटीत प्रचंड चांगले बदल करण्यात आले आहे. याशिवाय झॉम्बी इनफेक्शनचे जबरदस्त इफेक्ट्स आता अनुभवता येणार आहेत. पब्जी गेम बद्दल अनेकांच्या मनात आकर्षण असते. पब्जीच्या वेडेपणामुळे अनेक वाईट प्रसंग देखील गेम खेळणाऱ्यांवर आल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, तरीही पब्जीची क्रेझ काही केल्या कमी झालेली नाही. त्यामागे कारणही अगदी तसेच आहे. पब्जी वेळोवेळी गेममध्ये अपडेट करुन गेमर्सला नवे आव्हान देत असते. गेमर्स हे आव्हान पेलण्याचे शिवधनुष्य उचलतातही, परंतु गेम खेळताना त्यांचे नाके नऊ येते. आता या गेमर्स पुढे पुन्हा मोठे आव्हान पब्जी घेऊन आला आहे. त्यामुळे हे आव्हान गेमर्स कसे पूर्ण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा – राख्यांच्या बाजारातही पब्जीचे ‘आक्रमण’

- Advertisement -

पब्जीने ट्विटरवर दिली माहिती

नव्या वर्जनबाबत पब्जीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच ते साडे नऊ दरम्यान पब्जी गेम डाऊन झाला होता. त्यामुळे गेमर्सला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. यासंदर्भात पब्जीने ट्विटद्वारे माहिती दिली की, पब्जीमध्ये काही महत्त्वाचे बदल करायचे होते, त्यामुळे सकाळी साडे पाच ते साडे नऊ हा गेम डाऊन होता. आता नवे वर्जन सुरु झाले आहे. नव्या वर्जनची मज्जा अनुभवण्यासाठी प्ले स्टोअरवरुन पब्जी डाऊनलोड करा, असे आवाहन पब्जी कंपनीने दिली आहे.

हेही वाचा – सायनमध्ये सामाजिक संदेश देणारी पब्जीची होळी

- Advertisement -

असा खेळा नवा पब्जी

पब्जीने केलेल्या बदलात इन्पेक्शन मोड सुरु करण्यात आले आहे. प्लेअर वर्सेस प्लेअर हा नवा फिचर मोड देखील अॅड करण्यात आला आहे. या फिचर्सनुसार आता प्लेअर्स झॉम्बी बनणार आहे. त्यामुळे या गेमचा चित्तथरारक असा अनूभव गेमर्सला घेता येणार आहे. हा गेम सुरु झाला की, प्लेअर्स झॉम्बी आणि डिफेनडरमध्ये बदलणार आहेत. झॉम्बीने जर डिफेनडरला मारले तर त्या डिफेनडरचे रुपांतर झॉम्बीमध्ये होईल. जर डिफेन्डर सर्व प्लेअर मारले गेले तर झोम्बी जिंकणार आणि या सर्वांमध्ये एक जरी डिफेन्डर जिवंत राहिला तर तो डिफेंडरचा विजय असेल.

हेही वाचा – लहान मुलांमध्ये ‘पब्जी पिचकारी’ची क्रेझ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -