घरट्रेंडिंगRakshaBandhan2021: शेणापासून बनवलेल्या राखीला दिल्लीसह अनेक राज्यांत मागणी

RakshaBandhan2021: शेणापासून बनवलेल्या राखीला दिल्लीसह अनेक राज्यांत मागणी

Subscribe

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रंगसंगतीच्या आणि लक्षवेधी राख्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून येत आहे. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. याच पवित्र सणाच्या दिवशी भावाच्या हातावर बांधण्यात येणाऱ्या राख्यामध्ये वैविध्य असल्याचे पाहायला मिळत आहे. पारंपारिक राख्या, पर्यावरण पूरक राख्या, कार्टून्सच्या राख्या यासह वेगवेगळे ट्रेण्ड देखील बाजारात दरवर्षी दिसतात मात्र यंदा लक्षवेधी ठरताय त्या म्हणजे शेणापासून बनवलेल्या राख्या.

या पर्यावरण पूरक आणि शेणापासून बनवलेल्या राख्या महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह अनेक मोठ्या राज्यांच्या बाजारपेठांमध्ये दिसून येत आहेत तर या आकर्षक राख्यांची मागणी देखील वाढली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या सीमेला लागून असलेल्या कुम्हारीच्या सुरभी गौशालामध्ये यावर्षी बनवल्या जाणाऱ्या शेणाच्या राख्यांची मागणी आतापासून वाढली आहे. या राख्यांचे बाजारात स्टॉल लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

पर्यावरणपूरक राख्यांची जोरदार विक्री

गोशाळेत बनवल्या जाणाऱ्या राख्या पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. यामध्ये शेण, औषधी वनस्पतींचा रस, धागा आणि नैसर्गिक रंग वापरून या राख्यांना आकर्षक लुक दिला जात आहे. यामुळेच अनेक राज्यातील मोठ्या शहरात या राख्यांची मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे या राख्या बनवण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सुरू करण्यात आले होते, जेणेकरून रक्षाबंधनापर्यंत मागणी पूर्ण होऊ शकेल.

रायपूरच्या सुरभी गोशाला चालवणाऱ्या रेणू अवस्थी यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारी नोकरी सोडली आहे. रेणूची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), रायपूरमध्ये सहाय्यक लेखापाल म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी २०१७ मध्ये ही नोकरी सोडली. कारण आजच्या काळात वावरताना आता महिलांना स्वावलंबी बनवण्याची गरज आहे, असे सांगितले. शेणापासून बनवलेल्या राख्या १० ते ५० रुपयांना विकल्या जात आहेत. यामध्ये भाजीपाला बियाणे देखील टाकले जात आहे, जेणेकरून राखी बांधल्यानंतर, घराच्या आवारात बी पेरले जाते आणि ते बियाणे रोपामध्ये बदलते.


Shravan 2021: श्रावणात येणारे सण आणि श्रावण महिन्याचे महत्व

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -