Viral Video: पंजाबी गाण्यावर रावणाचा भांगडा,पहा व्हिडिओ

रावणाच्या भांगड्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा रावण हातात थेट बंदूका घेऊन नाचत आहे

Ravana's bhangra on Punjabi song video viral on social media
Viral Video: पंजाबी गाण्यावर रावणाचा भांगडा,पहा व्हिडिओ

देशभरात दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी रामाने रावणाचा अंत केला होता. त्यामुळे रावण दहन करण्याचा एक कार्यक्रम संपूर्ण देशभरात केला जाता. सध्या सोशल मीडियावर एका रावणाचा व्हिडिओ व्हायरल होत ज्यात हा रावण चक्क पंजाबी भांगड्यावर नाचताना दिसत आहे. ३० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये नेटकरी अगदी हसून हसून लोटपोट झाले आहेत. हा मजेशीर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून हा व्हिडिओ ट्रेडिंग लिस्टमध्ये आहे.

या व्हिडिओमध्ये रावणाचा वेश केलेला एक माणूस पंजाबी गाण्यावर तुफान नाचताना दिसत आहे. मित्र दाना चलदा या पंजाबी गाण्यावर हा रावण भांडगा करत आहे. तिथे उपस्थित सर्व लोक देखील रावणाच्या या भांगड्याचा मनापासून आनंद घेताना दिसत आहेत. रावणाच्या भांगड्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा रावण हातात थेट बंदूका घेऊन नाचत आहे. तिथे उपस्थित सर्व लोकही रावणाचा जयजयकार करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत व्हिडिओला २३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे जवळपास ३००हून अधिक लोकांनी व्हिडिओ रिट्विट देखील केला आहे. नेटकरी या व्हिडिओचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत असे म्हटले आहे की, ‘रावणाचा हा डान्स ह्रदयाला स्पर्श करुन गेला. व्हिडिओमुळे माझ्या दिवसाची सुरुवात आनंदाने सुरू झाली.’ काहींनी तर ‘असा रावण असता तर जनता किती आनंदी राहिली असती’,अशा कमेंट देखील केल्या आहेत.


हेही वाचा – mountain gorilla : १४ वर्षांपूर्वी जीव वाचणाऱ्या व्यक्तीच्या कुशीतच ‘माउंटेन गोरिल्ला’ने सोडला प्राण