घरट्रेंडिंग'हा' शाकाहारी तरुण 77 दिवसांपासून खातोय कच्चे मांस

‘हा’ शाकाहारी तरुण 77 दिवसांपासून खातोय कच्चे मांस

Subscribe

इन्स्टाग्रामवर Raw Meat Experiment नावाच्या एका अकाउंटवरुन या माणसाने हे चॅलेंज सुरू केले. या अकाऊंटवर त्याने त्याच्या 77 दिवसांचा कच्चे मांस खाण्याचा प्रवास शेअर केला आहे. दररोज हातात कच्चे मांस आणि कच्च्या अंड्यांनी भरलेला ग्लास समोर ठेवून त्यांने कच्चे मांस खाऊन दाखवले आहे.

आपल्याकडे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारातील लोक आहेत शाकाहारी लोक कधीच मासांहाराच नाव देखील काढत नाही. मात्र कट्टर शाहकाही जर कधी मांसाहार खाऊ लागला तर हैराण होण्याची गरज नाही. कारण अमेरिकत राहणारा एक शुद्ध शाकाहारी माणूस अचानक मांसाहारी झाला असून मागच्या 77 दिवसांपासून केवळ कच्चे मांस खात आहे. या माणसाने याआधी कधी साधे अंडे देखील खाल्ले नव्हते मात्र तो अचानक कच्चे मांस खाऊ लागल्याने सर्वच हैराण झाले आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, हा माणूस दररोज मासे आणि चिकन यासारखे मांसाहारी पदार्थ कापून ते अंडी किंवा कच्च्या दुधाने धुतो. त्यानंतर तो ते मांसाहारी पदार्थ न शिजवता कच्चे खातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेली 77 दिवस केवळ कच्चे मांस खाऊन हा माणूस जिवंत राहिला आहे आणि त्याच्यात कोणतीही अस्वस्थता देखील दिसून आलेली नाही.

- Advertisement -

हा माणूस मागच्या तीन वर्षापासून शुद्ध शाकाहारी होता. दूध,पनीर, अंडी, मांस यासारखे पदार्थ त्याने कधीही खाल्ले नव्हते. त्याने स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचे ठरवले आणि कच्चे मांस खाण्याचा निर्णय घेतला. इन्स्टाग्रामवर Raw Meat Experiment नावाच्या एका अकाउंटवरुन या माणसाने हे चॅलेंज सुरू केले. या अकाऊंटवर त्याने त्याच्या 77 दिवसांचा कच्चे मांस खाण्याचा प्रवास शेअर केला आहे. दररोज हातात कच्चे मांस आणि कच्च्या अंड्यांनी भरलेला ग्लास समोर ठेवून त्यांने कच्चे मांस खाऊन दाखवले आहे. त्याच्या या चॅलेंजने आतापर्यंत 53 हजारांहून अधिक फॉलोवर्स त्याने कमावले आहेत. चॅलेंजमध्ये सुरू केलेला हा प्रवास हा त्या माणसाची जीवनशैली झाली आहे.

- Advertisement -

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, कच्चे मांस खाल्ल्याने त्याचा आपल्या शरिरावर परिणाम होऊ शकतो. कच्चे मांस खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होऊ शकते. त्याचप्रमाणे अनेक आजार होण्याचा धोका देखील वाढू शकतो.


हेही वाचा – अरेरे ! पेस्ट्रीची लावली पार वाट ; PHOTO पाहून खव्वयांचा उडाला विश्वास

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -