घरट्रेंडिंगएका महिन्यात World Record ब्रेक! ३७ वर्षीय महिलेने एकाचवेळी दिला १० बाळांना...

एका महिन्यात World Record ब्रेक! ३७ वर्षीय महिलेने एकाचवेळी दिला १० बाळांना जन्म!

Subscribe

दक्षिण आफ्रिकेतून एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने एकाच वेळी १० मुलांना जन्म दिल्याने नवा विश्वविक्रम केला आहे. गेल्या महिन्यात एकाच वेळी सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा विक्रम मोरोक्कोच्या माली येथील हलीमा सिसी नावाच्या महिलेने केला होता. या महिलेने एकावेळी ९ मुलांना जन्म देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले. परंतु, आता अवघ्या एका महिन्यातच या महिलेचा विक्रम मोडला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी गोसियामी धमारा सिटहोल नावाच्या ३७ वर्षीय महिलेने एकाचवेळी तब्बल १० मुलांना जन्म दिला. यासाठी या महिलेचे ऑपरेशन करण्यात आले. या महिलेने सात मुले व तीन मुलींना जन्म दिला. गर्भधारणेच्या तपासणी दरम्यान, डॉक्टरांनी तिला ६ मुलांची अपेक्षा असल्याचे सांगितले होते.

या घडलेल्या घटनेनेंतर आफ्रिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटहोलच्या पतीला आठ मुलांच्या जन्माची अपेक्षा होती. तपासणी दरम्यान ८ मुलं होतील असेच समोर आले होते. मात्र या दोन्ही मुलांचा शोध लागला नाही. आपल्या १० मुलांच्या जन्मामुळे हे जोडपे अत्यंत आनंदी असून कुटुंबात उत्सवाचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. एकाच वेळी १० मुलांना जन्म देणे गोसियामी धमारा सिटहोलसाठी सोपे नव्हते ते आव्हानात्मक होते. डॉक्टरांनी खूप काळजीपूर्वक तिचे ऑपरेशन केले आणि सर्व मुलांना वाचविण्यात यशस्वी प्रयत्न केला. सिटहोलने असे सांगितले, ‘तिला तिच्या गरोदरपणाबद्दल स्वतःलाच आश्चर्य वाटले.’

- Advertisement -

सिटहोलने असेही सांगितले की, ती गरोदरपणात खूप आजारी पडली होती. तो त्याच्यासाठी खूप कठीण काळ होता आणि अजूनही खूप कठीण जात आहे. पण आता तिला आणि तिच्या पतीला याची सवय झाली आहे. माझ्या प्रसूतीदरम्यान मी फक्त देवाचीच प्रार्थना करत होती की माझी सर्व मुलं नीट व्हावी आणि प्रत्येकजण निरोगी रहावा. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, सिटहोलचे सर्व मुले पूर्णपणे निरोगी आहेत, पुढील काही महिन्यांपर्यंत ते इनक्यूबेटरमध्ये राहतील. या प्रसंगी सिटहोल आणि तिचा पती अत्यंत आनंदी आणि भावनिक झाले होते.


Surya Grahan 2021: यंदाचे पहिले सूर्यग्रहण उद्या लागणार; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -