फ्लिपकार्टचा प्रजासत्ताक सेल

मोबाईलवर घसघशीत ऑफर्स

Flipcard Poco Days Sale: Get a smartphone in your budget
फ्लिपकार्ट Poco डेज सेल: स्मार्टफोन घ्या तुमच्या बजेटमध्ये

फ्लिपकार्टचा प्रजासत्ताक दिवस सेल येत्या २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा सेल २२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोनवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. सेलच्या प्रत्येक दिवशी दुपारी २ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २६ टक्के एक्ट्रा डिसकाऊंट मिळेल. १,४५० रुपयांच्या खरेदीवर १० टक्के सूट मिळेल, तर १९५० रुपयांच्या शॉपिंगवर १५ टक्के डिस्काऊंट मिळेल.

स्मार्टफोनबाबत बोलायचं झालं तर या फोन्सवर सेलमध्ये जबदस्त डिल्स करता येतील. सेलमध्ये रियलमी २ प्रो (Realme 2 Pro) वर १००० रुपयांची सूट मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ (Samsung Galaxy S 8) ४ हजारांची सूट मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ (Samsung Galaxy On 6) या फोनवर ४,५०० रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट देण्यात येणार आहे. ओप्पो एफ ९ (Oppo F 9) या फोनवर ४००० रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट मिळणार आहे.

शाओमी पोको एफ १ (Xiaomi Poco F 1) एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मोटोरोला वन पावर (Motorola One Power) या फोनवरही एक हजार रुपयांची सूट आहे. नोकिया ६.१ प्लस (Nokia 6.1 Plus) या फोनवर एक हजार, तर पिक्सल २ एक्सएल (Pixel 2 XL) या फोनवर दोन हजार रुपयांची सूट मिळणार आहे.