घरट्रेंडिंगअवनीच्या शिकारीचं पापही माथी घ्या - उद्धव ठाकरे

अवनीच्या शिकारीचं पापही माथी घ्या – उद्धव ठाकरे

Subscribe

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राजकारण तापले आहे. शिकारीची निंदा होत असताना यावर चौकशीसाठी समिती नेमण्याचे सरकारने आश्वासन दिले. चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांना समितीवर नेमण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अवनी वाघिणीची शिकारीवर राजकारण तापत असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पून्हा या शिकारीवरून सरकारवर निशाना साधला. शिकारीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर निवृत्त न्यायाधिश बसवण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय जसे सरकारने घेतले तसेच अवनीच्या शिकारीचं पापही माथी घ्या अशी टीका उद्धव यांनी केली. आज मातोश्रीवर आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले. याच बरोबर महाराष्ट्रातील दुष्काळाबाबतही त्यांनी वक्तव्य केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

“अवनी वाघिणीच्या शिकार करण्यात आली. त्यानंतर आता ही शिकार नियमानुसार केली गेली की नाही? यासाठी समिती नेमली आहे. ज्या लोकांना अवनीच्या हत्येची सुपारी दिली त्यांनाच या समितीवर नेमण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी निवृत्त न्यायाधीशांना या समितीवर नेमून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांनी काही वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली, मग सर्जिकल स्ट्राईक काय मोदींनी केलं होतं? या चौकशी समितीला काही अर्थ नाही.

- Advertisement -

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाडा विदर्भ भागातील शेतकरी कुटुंबाची या दुष्काकामुळे दयनीय अवस्था आहे. एन दिवाळीच्या तोंडसवर दुष्काळाच्या झळा शेतकरी कुटुंबाना बसत आहेत. अश्या दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या ५ हजार शेतकरी कुटुंबाना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. अमरावती, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, जालना, बीड , लातूर, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद, आणि यवतमाळ येथील शेतकरी कुटुंबाना १५ किलो गहू आणि तांदूळ, ५ लिटर गोडेतेल, ५ किलो साखर, ३ किलो डाळ, २ किलो रवा आणि मैदा, ३ किलो डालडा, उटणं आणू साबण अश्या दिवाळी आणि ग्रुपयोगी वस्तू आज पाठवण्यात आल्या आहेत.”- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

भाजपाच्या आमदारांनी शिवसेनेत केला प्रवेश

याचवेळी भाजपच्या विद्यमान मध्यप्रदेश चे आमदारानी मातोश्रीवर शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. भाजपाचे मध्य प्रदेश येथील धरमपुरी क्षेत्रातील विद्यमान आमदार कालुसिंह ठाकूर आणि भाजपाचे मध्य प्रदेश येथील माजी गृहमंत्री जगदीश मुवेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. शिव व्यापारी सेनेच्या पुढाकाराने शिवसेनेत मध्य प्रदेश मधील भाजपच्या आजी माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -