घरट्रेंडिंगप्रलंबित मागण्यांसाठी ठाण्यातील रिक्षाचालकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी ठाण्यातील रिक्षाचालकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन

Subscribe

रिक्षा-टॅक्सीवाल्यांचे अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारला आणि आधीच्या महाविकास आघाडी सरकारला देखील कळवले होते, मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर रिक्षा चालकांनी संपाची हाक दिली आहे.

विविध प्रलंबित मागण्यासाठी ठाण्यातील रिक्षाचालक सोमवारी संपावर जाणार आहेत. भाडे दरवाढ लागू करा, ऑटो रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप बंद करा किंवा १० ते १५ वर्षे स्थगिती द्या यासह कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या विविध मागण्याांसाठी १ ऑगस्ट रोजी रिक्षा-टॅक्सीवाले काम बंद आदोलन करणार आहेत. (Rickshaw drivers rickshaw closed protest on Monday for their pending demands in Thane)

रिक्षा-टॅक्सीवाल्यांचे अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारला आणि आधीच्या महाविकास आघाडी सरकारला देखील कळवले होते, मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर रिक्षा चालकांनी संपाची हाक दिली आहे. शिवाय, तोडगा निघाला नाही तर संप आणखी काही दिवस पुढे ढकलणार असल्याचा इशाराही युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.

- Advertisement -

या आहेत प्रलंबित मागण्या?

  • ऑटो रिक्षा-टॅक्सीची प्रलंभित भाडे दरवाढ बिनाविलंब लागू करा.
  • ऑटो रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप बंद करा किंवा १० ते १५ वर्षे स्थगिती द्या.
  • नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनाव्दारे दंड आकारणी (वाहतूक पोलीसांकडून मोबाईल फोटो वारे होणारी वसुली बंद करा.
  • ऑटो रिक्षा-टॅक्सी करीता स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना सुविधा द्या.
  • थर्ड पार्टी विमा रक्कम (इन्शुरन्स) कमी करा.
  • रिक्षा-टॅक्सी पासिंग
  • प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर.टी.ओ.) वाहनांची ब्रेक टेस्ट तपासणी ट्रक निर्माण करा.
  • चोरटी प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनांना प्रतिबंध करा.
  • ऑटो रिक्षा-टॅक्सी स्टॅण्ड बसवुन द्या व नविन रिक्षा स्टॅण्ड का परवानगी द्या
  • ऑटो रिक्षा-टॅक्सी या वाहनांची वयोमर्यादा रद्द करा.
  • ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांना शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्ज माफी द्या.
  • ऑटो रिक्षा-टॅक्सीना कर्ज पुरवठा करणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभार करणाऱ्या संस्था चालकांवर कायदेशीर कारवाई करा.
  • मनमानी कारभार करणारे रिक्षा बितरक (डिलर) यांचेवर कायदेशीर कारवाई करा.
  • शासकीय-निमशासकीय व खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परवाना रद्द करा.

हेही वाचाआवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे नावडते झाले; जयंत पाटीलांची शिंदे गटावर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -