घरट्रेंडिंगसोशल मीडियावर चर्चा 'रॉकेट' अंकलची

सोशल मीडियावर चर्चा ‘रॉकेट’ अंकलची

Subscribe

व्हायरल झालेला हा व्हिडिओ २८ ऑगस्टचा आहे. वायएसआरचे जगनमोहन रेड्डी यांच्या रॅलीच्यावेळी त्यांनी रॉकेट सोडले होते. त्यावेळी हा व्हिडिओ कोणीतरी शूट केला.

चायवाली आँटी, डान्सिंग अंकल नंतर आता रॉकेट अंकलची चर्चा सोशल मीडियावर आहे. तोंडातील सिगरेटने एक दोन नाही तर चक्क ११ रॉकेट या महाशयांनी हवेत सोडले. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला या काकांचा कारनामा पाहून आश्चर्य वाटले असेल. कारण फटाक्यांना फोडण्याचा असा नवा प्रकार आजपर्यंत कोणी पाहिला नव्हता. त्यामुळेच रॉकेट उडवण्याचा त्यांचा हा प्रताप पाहून नासाचा ‘नवा शास्त्रज्ञ’ असा मथळा देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि तो चांगलाच व्हायरल झाला.

कोण आहेत हे रॉकेट काका?

रॉकेट काकांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा माणूस कोण याचा शोध अनेक प्रसारमाध्यमांनी घेतला. अनेकांनी त्यांची विस्तृत मुलाखत देखील घेतली. त्यावेळी हे रॉकेट काका आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम भागातील असून त्यांचे नाव मल्ला संजीव राव असे असून ते पिस निकाडा गावात राहतात. पेशाने शेतकरी असलेल्या मल्ला संजीव यांचे फटाक्यांचा कारखाना देखील आहे.

- Advertisement -

(सौजन्य- माय टी मग, युट्युब)

कोणी केला व्हिडिओ व्हायरल?

व्हायरल झालेला हा व्हिडिओ २८ ऑगस्टचा आहे. वायएसआरचे जगनमोहन रेड्डी यांच्या रॅलीच्यावेळी मल्ला संजीव यांनी रॉकेट सोडले होते. त्यावेळी हा व्हिडिओ कोणीतरी शूट केला. हा व्हिडिओ ब्रम्हा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर झाला आणि हा हा म्हणता व्हायरलसुद्धा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -