घरट्रेंडिंगसामना: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली

सामना: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली

Subscribe

सामनाच्या त्या अग्रलेखानंतर आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका झाल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील आपल्या स्टाईलने त्यावर पलटवार केला होता. त्यानंतर काल अजित पवार यांचे पुतणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा कणा ताठ नसल्याची टीका केली. त्यानंतर मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याची बाजू उचलून धरत एकमेकांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी #वायफळ या हॅशटॅगचा वापर करत उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे.

ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कुणीही जाहीर निवडणूक लढवलेली नाही. हाच धागा पकडत काही कार्यकर्त्यांनी अजित पवार जेवढ्या मताधिक्याने निवडून येतात तेवढा सामनाचा खप तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

अजित दादा पवार

Posted by Yadav Gadekar on Saturday, 27 October 2018

तर ज्यामुळे अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात राममंदिरामुळे वाद निर्माण झाला होता. त्यावरुनही काही कार्यकर्ते आता प्रश्न विचारत आहेत. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा निर्णय राखून ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन काय करणार आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

कोर्टाने आता राममंदिर सुनावणी जानेवारी २०१९ पर्यत स्थगित केली आहे. मग २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन #शेणेवाले काय करणार आहेत?

Posted by Shubham Jatal JD on Monday, 29 October 2018

तर दुसऱ्या बाजूला स्व. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करण्यासाठी विविध व्यंगचित्र वापरले जात आगहेत.

एका नेटीझन्सने खालील फोटो शेअर केला आहे. त्यात अजित पवार बैलगाडीतून शेतकऱ्यांचा मोर्चा काढत आहेत. तर वरच्या बाजुला उद्धव ठाकरे यांचा बॅनर दिसतोय. कृतीतून आमचा नेता कसा चांगला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्याने केला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा आमचा नेता.आणि नुसती बॅनरबाजी करून नौटंकी करणारा फावडा करंटा ठाकरे

Posted by Akshay Shinde on Sunday, 28 October 2018

सामनाच्या अग्रलेखाचा निषेध म्हणून पुण्यातील पुरंदर येथे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि सामना वृत्तपत्राची होळी करण्यात आली.

अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांचा पुतळा जाळण्यात आला तसेच सामना पेपरचीही विकृत लिखानाबद्दल होळी करण्यात आली.#सासवड #पुरंदर

Posted by Santosh Kolte on Monday, 29 October 2018

ट्विटरवर काही कार्टून शेअर करत सामना वृत्तपत्रावर टीका करण्यात आली आहे.

ट्विटरवर काहींनी रोहित पवार यांचे कौतुक केले आहे. रोहित पवार तरुण नेता असूनही उद्धव ठाकरे यांच्यावर विधायक भाषेत टीका केल्यामुळे आता रोहित पवार परिपक्व राजकारणी झाले असल्याचे मत काही नेटीझन्सनी व्यक्त केली आहे.

हे वाचा – पवारांच्या तिसर्‍या पिढीचं ठाकरेंना आव्हान

एका नेटीझन्सने पवार एकटवले तसे ठाकरे का नाही एकटवत असा प्रश्न उपस्थित करत खंत व्यक्त केली आहे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -