Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर झाला हेअर स्टायलिस्ट

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर झाला हेअर स्टायलिस्ट.

sachin tendulkar cut his son hair at home posted video on instagram

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर बंदी आहे. तसेच सरकारने घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे. दरम्यान, अनेक नागरिक घरात राहून आपला वेळ कसा घालवायचा या विचारात आहेत. तर सलून बंद अल्यामुळे केस आणि दाढी हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे अनेक जण घरातच केस कापत आहेत. यामध्ये भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील काही मागे नाही.

 

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर या लॉकडाऊन काळात हेअर स्टायलिस्ट झाला आहे. आपला मुलगा अर्जुनचे केस कापतानाचा एक व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सचिन तेंडुलकर आधीपासूनच सक्रीय आहे. त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यापासून ते अनेक संस्थांच्या स्वच्छताविषक उपक्रमात सचिन सहभागी झाला आहे. तसेच सुरुवातीपासूनच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे देखील सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.


हेही वाचा – धोनीच्या ‘त्या’ प्रेरणेने द्विशतक ठोकलं, रोहित शर्माचा खुलासा