घरट्रेंडिंगSBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती २०२० च्या फीस रिफंडसाठी...

SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती २०२० च्या फीस रिफंडसाठी ‘येथे’ करा क्लिक

Subscribe

भारतीय स्टेट बॅंकेकडून अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाने अॅप्रेंटिस ८ हजार ५०० पदांच्या फी परताव्याची ऑनलाइन लिंक अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते आणि फी जमा केली होती ते आता त्यांचे शुल्क परत मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. जेणेकरून एसबीआयतर्फे सर्व अर्जदारांचे अर्ज शुल्क परत देण्यात मदत होऊ शकेल. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटीस जारी करून अर्जदारांना शुल्क परताव्यासाठी अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, अप्रेंटिस अधिनियम १९६१ अंतर्गत जाहीरात क्रमांक सीआरपीडी/एपीपीआर/२०२०-२१/०७ दिनांक २० नोव्हेंबर २०२० ला अप्रेंटीसशिप नियुक्ती प्रक्रिया रद्द करण्यात आली. ज्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करुन शुल्क भरले होते त्यांना ते रिफंड केले जाणार आहे.

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

ज्या उमेदवारांचे अर्ज शुल्क त्यांच्या बँक खात्यात जमा करता आले नाही, अशा अर्जदारांच्या परताव्यासाठी बँकेने एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर विचारणा करण्यात आली आहे. अशा उमेदवारांनी शुल्क परत मिळण्यासाठी एसबीआयची अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन अर्ज करावा. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन विभागाने अर्जदारांना बॅंक अकाऊंट नंबरची डिटेल्स देण्यासाठी एक डेटा कॅप्चर लिंक दिली आहे. ही लिंक ३१ ऑगस्ट २०२१ ला रात्री ११.५९.५९ पर्यंत सुरु राहणार आहे.

- Advertisement -

या अर्जदारांना परत मिळाले शुल्क

ज्या अर्जदारांनी त्यांच्या बँकेतून थेट शुल्क जमा केले होते त्यांचे शुल्क बँकेने परत केले आहे. या सर्व उमेदवारांसाठी, एक ईमेल आणि एसएमएस त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर आणि अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठवले गेले.

अशी होती भऱती प्रक्रिया

या भरती प्रक्रियेच्या मोहिमेद्वारे, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश सारख्या अनेक राज्यांच्या शाखांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण ८ हजार ५०० रिक्त जागांची भरती होती. यापैकी ३ हजार ५९५ पदे जनरल कॅटेगरी, ८४४ ईडब्ल्यूएस, ओबीसी -१ हजार ९४८ अनुसूचित जातीसाठी १ हजार ३८८ आणि एसटीसाठी ७२५ पदे राखीव होती.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -