घरट्रेंडिंगGoodNews! दृष्टीहिन बघू शकणार जग; वैज्ञानिकांनी तयार केला जगातला पहिला 'Bionic' डोळा

GoodNews! दृष्टीहिन बघू शकणार जग; वैज्ञानिकांनी तयार केला जगातला पहिला ‘Bionic’ डोळा

Subscribe

१० वर्षांच्या अथक मेहनतीनंतर Bionic Eye तयार

दृष्टीहिन असणाऱ्यांना आता जग बघता येणार आहे कारण ऑस्ट्रेलियातील मोनाश यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी जगातला पहिला ‘बायोनिक’ डोळा तयार केला असल्याचे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलियातील मोनाश यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीनंतर Bionic Eye तयार केला असून या डोळ्याच्या मदतीने दृष्टीहीनता दूर होणार आहे. दिलासादायक म्हणजे या डोळ्याची ट्रायलही झाली आाहे. आता हा डोळा मनुष्यावर लावण्याची तयार सुरू आहे.

thelogicalindian.com ने दिलेल्या माहितीनुसार, यूनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक लाओरी यांनी सांगितले की, आम्ही एक अशी वायरलेस ट्रान्समीटर चीप तयार केली आहे. जी डोक्याच्या पृष्ठभागावर फिट केली जाईल. आम्ही याला ‘बायोनिक आय’ असं नाव दिलं आहे. यात कॅमेरासोबत एक हेडगिअर फिट करण्यात आलाय. जो आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवून थेट मेंदूशी संपर्क करू शकेल.

- Advertisement -

१० वर्षांच्या अथक मेहनतीनंतर Bionic Eye तयार

बायोनिक डोळा जन्मताच नेत्रहीन व्यक्तीला लावला जाऊ शकतो. संशोधकांनी डिवाइस विकण्यासाठी फंडची मागणी केली आहे. दरम्यान गेल्या वर्षी संशोधकांना ७.३५ कोटी रूपयांचा फंड दिला गेला होता, असे प्राध्यापक लाओरी यांनी सांगितले तसेच हा अनोखा डोळा तयार करण्यासाठी १० वर्षांपेक्षा जास्तचा काळ लागला असल्याचे पण त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील मोनाश यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या शोधादरम्यान १० डिवाइस प्रयोग मेंढ्यांवर करण्यात आला होता. यातील ७ डिवाइस मेंढ्यांच्या आरोग्याला कोणतंही नुकसान न पोहोचवता ९ महिने अॅक्टिव राहिले, असे मोनाश बायोमेडिसिन डिस्कवरी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर यान वॉंग यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -