घरट्रेंडिंगमंजेश्वरी ब्रदर्सनंतर शंकरपाळ्या आणि कारल्याचं भांडण तुफान व्हायरल

मंजेश्वरी ब्रदर्सनंतर शंकरपाळ्या आणि कारल्याचं भांडण तुफान व्हायरल

Subscribe

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. आजकाल लहान मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्यांच्या गाण्यांचे काही व्हिडिओ फारच व्हायरल झाले होते. मंजेश्वर ब्रदर्स या नावाने या चिमुकल्यांना ओळखले जात. या निरागस मुलांनी त्यांच्या आवाजाने नेटकऱ्यांना भुरळ पाडली. आता मंजेश्वर ब्रदर्सनंतर आणखीन दोन चिमुकले चांगलेच चर्चेत आले आहेत. शंकर आणि कार्तिक असे या दोन चिमुकल्याचे नाव आहे. शंकर आणि कार्तिक हे गाणं गाऊ चर्चेत आले नसून त्यांच्या भांडण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आले आहेत. या दोघांचा भांडताचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील कळमेश्वर गावातील ही घटना आहे. शंकर आणि कार्तिक दोघेही चांगले मित्र, पण खेळता खेळता अचानक त्यांची भांडण झाली. भांडताना ते दोघे एकमेकांना टोपण नावाने चिडवायला लागले आणि मग त्यांची भांडण वाढली. यामधल्या कार्तिकने शंकरला ‘अय..शंकरपाळ्या’ म्हणून चिडवले. मग शंकरने देखील एकदम फिल्मी अंदाजात कार्तिकला चांगलाच दम दिला. यावेळेस एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ही भांडण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील चर्चेच्या केंद्रस्थानी होती. या दोघांच्या व्हिडिओवरून विनोद आणि मीम्सचा पाऊसच पडला. पण या आता दोघांची भांडण मिटली आहेत. त्यामुळे शंकर आणि कार्तिक यांच्या भांडण मिटल्याची मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

 

शंकरपाळ्या😂😂😂😂

Posted by राजकीय memes on Thursday, January 28, 2021

- Advertisement -

 

 

- Advertisement -

हेही वाचा – काय सांगताय! तुमच्या गाडीचा शेवटचा नंबर १ आहे? मग वाचा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -