घरट्रेंडिंगबाबो! चक्क २३ लाखांना विकला कुत्रा

बाबो! चक्क २३ लाखांना विकला कुत्रा

Subscribe

कुत्र्यांच्या अनेक जाती आहेत. वेगवेगळ्या जातींचे कुत्रे हे मोठी किंमत देऊन विकत घेतले जातात. प्राणी प्रेमींना यात खास इंस्ट्रेस्ट असतो. मात्र एक सामान्य कुत्रा लाखांच्या किंमतीत विकला गेला आहे. त्याची सध्या जोरदार चर्चाही सुरु आहे. शिपडॉग (Sheepdogs) असे या कुत्र्यांच्या प्रजातीचे नाव आहे. या जातींचे कुत्रे हे मेंढ्यांसोबत राहतात म्हणूनच या कुत्र्यांना शिपडॉग असे म्हटले जाते. हे कुत्रे बऱ्यापैकी केसाळ असतात. अगदी सर्वसाधारण दिसणाऱ्या या कुत्र्याने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘किम’ असे या कुत्र्यांचे नाव आहे. किम एक वर्षांची होण्याआधीच तिला विकण्यात आले. किमला २७ हजार यूरो म्हणजेच २३ लाखांना विकण्यात आले आहे. किम एका सामान्य शेतकऱ्याकडे राहत होती.

डेवी जेनकिस या शेतकऱ्याकडे किम राहत होती. डेवीने किमला खूप छान सांभाळले होते. त्याच्याकडून किमला खूप काही शिकायला मिळाले होते. या आधी हिना नावाचा कुत्रा सर्वात महाग किंमतीत विकला गेला होता. हिनाला २० हजार यूरो म्हणजेच १७ लाख रुपयांना विकले होते. अशाप्रकारचे वर्किंग कुत्र्यांना ब्रिटनमधील लोक त्याच्या शेतात पाळतात.

- Advertisement -

डेवी यांनी सांगितले की, किमला आम्ही एक वर्षाचा होण्याआधीच विकले. किम ही जगातील सर्वात महाग शिपडॉग होती. ती एक फिमेल डॉग आहे. ती आमच्या बकऱ्या आणि मेंढ्यांवर लक्ष ठेवायची. सर्व गोष्टी तिने फार लवकर शिकल्या होत्या. किम गेल्याने आम्हाला दुख: झाले आहे. आम्हाला तिची खूप आठवण येते. पण ती चांगल्या माणसांकडे आहे याचा आम्हाला आनंद आहे, असे डेवी यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – Video: नवरदेवाकडून फोटोग्राफरच्या कानफडात, नवरी आली जोमात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -