घरट्रेंडिंगसूप बनवण्यासाठी केली नागाची खांडोळी; पण फणेने केला दंश, शेफचा मृत्यू

सूप बनवण्यासाठी केली नागाची खांडोळी; पण फणेने केला दंश, शेफचा मृत्यू

Subscribe

शेफ म्हटलं की काही ना काही नवीन पदार्थ ट्राय करून खवय्यांना त्या पदार्थाची चव चाखणं हे आलंच. मात्र दक्षिण चीनमध्ये एक अशी घटना घडली, जी जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः साप चावल्यामुळे लोकांचा मृत्यू होणे ही अगदी सामान्य घटना आहे. मात्र चीनमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये शेफने नागासारखा दिसणारा विषारी कोब्रा सापाचे डोके कापून बाजूला ठेवले. यानंतर, शेफने सापाचे सूप बनवण्याची तयारी सुरू केली. साधारण २० मिनिटांनंतर, शेफने ही कापलेल्या नागाचा फणा फेकण्यासाठी त्याला उचलंलं आणि त्याला जोरदार धक्का बसला. या कापलेल्या नागाच्या फणेने त्याला दंश केला, ज्यामुळे शेफचा जागीच मृत्यू झाला.

असा घडला प्रकार

दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात राहणारा शेफ पेंग फॅन इंडोचायनीज विषारी कोब्रा सापाच्या मांसापासून बनवलेले सूप तयार करत होता. यावेळी त्याला सापाच्या कापलेल्या फणेने चावा घेतला. विषारी कोब्रा सापाच्या मांसापासून बनवलेले सूप चीनमध्ये सर्वाधिक आवडीने केले जाते आणि खाल्लेही जाते. हे सूप बहुतेक रेस्टॉरंट्समध्ये खवय्यांना मिळते. शेफ पेंग फॅनने कोब्रा सापाचे डोकं कापल्यानंतर, सूप बनवण्यासाठी २० मिनिटांचा वेळ घेतला. यानंतर शेफने किचन साफ ​​करायला सुरुवात केली. काही वेळानंतर शेफने सापाचे कापलेले डोके कचऱ्यात फेकण्यासाठी उचलले, जेव्हा अचानक कापलेल्या सापाच्या डोक्याने त्याला दंश केला.

- Advertisement -

रेस्टॉरंटमध्ये आलेले ४४ वर्षीय लिन सन यांनी सांगितले की, ‘मी माझ्या पत्नीच्या वाढदिवसासाठी रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण करत होतो, तेव्हा रेस्टॉरंटमध्ये अचानक खूप गोंधळ झाला. आम्हाला काय होत आहे हे माहित नव्हते, परंतु रेस्टॉरंटच्या किचनमधून अचानक किंचाळणे ऐकू आले. यावेळी डॉक्टरांना फोन करण्यात आला, पण डॉक्टरांची टीम मदतीसाठी आली तोपर्यंत शेफचा आधीच मृत्यू झाला होता. ”


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -