घरट्रेंडिंगदेहविक्री करणाऱ्या महिलादेखील आपल्या मुलांना वाढवतातच - श्वेता साळवे

देहविक्री करणाऱ्या महिलादेखील आपल्या मुलांना वाढवतातच – श्वेता साळवे

Subscribe

अभिनेत्री श्वेता साळवे हिने आपल्या बोल्ड अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर नेटिझन्सकडून तिला ट्रोल करण्यात आले. मात्र त्याच बिनधासपणे तिने ट्रोल करणाऱ्यांना प्रतियुत्तर दिले आहे.

अभिनेत्री श्वेता साळवे हिने आपल्या बोल्ड अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर नेटिझन्सकडून तिला ट्रोल करण्यात आले. मात्र श्वेता तितक्याच बिनधासपणे त्यांना उत्तर दिली. हो मी मद्य घेते आणि सिगारेटही पिते, परंतू त्यामुळे मी काही वाईट आई होत नाही. देहविक्री करणाऱ्या महिला देखील आपल्या मुलांना वाढवतातच ना, असा सवाल तिने नेटिझन्सना केला आहे.

 

View this post on Instagram

A post shared by ⓢⓗⓥⓔⓣⓐ ⓢⓐⓛⓥⓔ (@shveshve) on

- Advertisement -

काय आहे प्रकरण

अभिनेत्री, मॉडेल, डान्सर असलेल्या श्वेता साळवे हिच्या फोटोजवर सोशल मीडियामधून नेटिझन्सकडून टिका करण्यात आली. तिला ट्रोल केले. ती तिच्या मुलीसाठी एक वाईट आई असल्याच हे उदाहरण आहे, असे कमेंट्स देण्यात आले. काही दिवसांपूर्वी श्वेताने तिच्या सोशल मीडियावर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले होते. यामध्ये ती मद्य आणि धुम्रपान करताना दिसत आहे. यावर तिला नेटिझन्सने ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

A post shared by ⓢⓗⓥⓔⓣⓐ ⓢⓐⓛⓥⓔ (@shveshve) on

- Advertisement -

श्वेताचे नेटिझन्सना खरमरीत उत्तर

श्वेताने आपल्या अंदाजाप्रमाणेच बोल्ड उत्तर ट्रोल केलेल्यांना दिले आहे. यासाठी तिने आणखी एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्याच्यासोबत लिहिल आहे की, हो मी मद्य आणि धुम्रपान करते. परंतू त्यामुळे मी काही वाईट आई असल्याचे सिद्ध होत नाही. तसेच तिने लोकांना विचारले आहे की, तुम्ही कधी माझ आयुष्य विस्कळीत झालेल पाहिल आहे का, तुम्ही कधी बेरोजगार पाहिले आहे का, मी एक अभिनेत्री आहे, डांसर आहे, मल्टीटास्कींग आई आहे. माझे खुप मित्र-मैत्रिण आहेत. ते सर्वजण मला जीव लावतात. जेव्हा महिला आपल्या मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी देहविक्री करतात, तेव्हा त्या काही वाईट आई होत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -