इलेक्ट्रिक बाबा! २५ हजार वोल्ट्सच्या झटक्यानंतरही पठ्ठ्या ठणठणीत

sitting on the roof of the freight train from katni was going to prayagraj youth scorched with ohe wire
इलेक्ट्रिक बाबा! २५ हजार वोल्ट्सच्या झटक्यानंतरही पठ्ठ्या ठणठणीत

मध्य प्रदेशच्या सतना रेल्वे स्टेशनवर अशी काही घटना घडली जी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. ट्रेनच्या वरती चढलेल्या एका पठ्ठ्याला २५ हजार वोल्ट्स करंट लागूनही जीव वाचल्याची घटना घडली आहे. या पठ्ठ्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमके काय घडले?

सतना रेल्वे स्टेशनवर एक विक्षिप्त व्यक्ती यार्डवर उभा असलेल्या मालगाडीवर चढला. त्यानंतर तो मालगाडीवर उभा राहिला आणि ओएचई वायरच्या संपर्कात आला. ओएचई (OHE wire) वायरमध्ये २५ हजार वोल्ट्स वाहणाऱ्या करंटमध्ये माणूस खाक झाला पाहिजे. पण दैव बलवत्तर असल्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला फक्त कपडे जळून खाक झाले.

आरपीएफ आणि जीआरपीने या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी या व्यक्तीची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले आहे.

जीआरपीचे सब इंस्पेक्टर जीपी त्रिपाठी यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती मालगाडीच्या वरती चढला आणि थोड्या प्रमाणात तो जळून खाली पडला. त्यानंतर रुग्णावहिकेतून त्याला घेऊन रुग्णालयात दाखल केले गेले. त्याच्या नातेवाईकांना याबाबत सूचना दिली आहे. अजूनही त्याच्या उपचार सुरू आहेत, सध्या त्याची काय स्थिती आहे, याबाबत डॉक्टर सांगितले. हा व्यक्ती उत्तर प्रदेश प्रयागराजचा रहिवाशी आहे.


हेही वाचा – महिलेचे शरीर कशाप्रकारे शुक्राणू स्विकारतात ? संशोधनातून आले समोर