Video: धाडसानं ६ महिन्यांच्या चिमुकल्यानं Water Skiing करून केला वर्ल्ड रेकॉर्ड!

या व्हिडिओला आतापर्यंत ७.६ मिलियन व्ह्यूज मिळाले असून तो ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या उटाह राज्यात सहा महिन्यांच्या लहान मुलाने वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे आणि वॉटर स्कीइंग करणारी सर्वात लहान व्यक्ती बनली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लेक पॉवेलमध्ये रिच हम्फ्रीज़ वॉटर स्कीइंग करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. न्यूज वेबसाइट यूपीआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिमुकल्याच्या आई-वडील, केसी आणि मिंडी हम्फ्रीस यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.

या चिमुकल्याच्या नावाने पालकांनी त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आहे. हा व्हिडिओ त्याच अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसते की, या चिमुकल्या मुलाने बोटीशी जोडलेल्या लोखंडी रॉडला घट्ट पकडले आहे. दुसरीकडे, त्याचे वडील दुसर्‍या बोटीवर होते आणि ते मुलाकडे पहात असून त्यांला प्रोत्साहित करताना दिसत आहे. मुलाने लाइफ जॅकेटही घातले असून तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ १३ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता, जिथे त्याला लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ७.६ मिलियन व्ह्यूज मिळाले असून तो ट्विटरवरही शेअर केला गेला आहे.एबीसी न्यूजच्या मते, आधीचा जागतिक विक्रम ऑबर्न एब्शर याने केला होता. जेव्हा तो त्याच्या पालकांसह वॉटर स्कीइंगला गेला तेव्हा तो सहा महिने आणि दहा दिवसांचा होता आणि या मुलाने वयाच्या ६ महिन्यात हा विक्रम केल्याने जागतिक रेकॉर्ड याच्या नावे नोंदविला आहे.