घरट्रेंडिंगVideo : सापासोबत खेळणं पडलं महागात

Video : सापासोबत खेळणं पडलं महागात

Subscribe

सापासोबत खेळणं एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

अनेकदा तरुण-तरुणी सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ शेअर करण्याच्या नादात कोणत्याही थराला जातात, अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण सापाशी खेळ करत असताना दिसत आहे. मात्र, सापासोबत खेळ खेळणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओत एक मुलगा त्याच्या सोबत असलेल्या सापासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होता. तसेच त्याला चिथवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सापाने त्या तरुणाला दंश करावा अशाच पद्धतीने हा मुलगा त्या सापासोबत खेळत होता. पण, अखेर तेच झालं जे त्याला मुलाला अपेक्षित नव्हतं. या तरुणाने तो साप डोक्यावर घेताच संधी साधत त्या सापाने तरुणाच्या डोक्याचा चावा घेतला आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ १९ सप्टेंबरला फेसबुकवर पोस्ट करण्यात आला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जो बघून तुम्हाला भीती वाटेल. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत कॅमेऱ्यासमोर असणाऱ्या व्यक्तीला एक साप चावताना दिसत आहे. तसेच, तो मुलगा सापाची छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे. मुलगा वारंवार त्याला दंश करावा यासाठी प्रोत्साहन करत आहे, असं दिसतं. अखेर संधी पाहून तो साप त्याच्या डोक्याला चावतो. हा व्हिडिओ रिपेटाईल हंटर या फेसबुक पेजने शेअर केला असून या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी बघितले आहे. तसेच, ३ हजार प्रतिक्रिया आणि ४ हजारांहून अधिक शेअर्स मिळाले आहेत. तसेच, एका सर्पमित्राने कमेंटमध्ये ‘तुम्ही जर सापाला त्रास दिला तर तो सूड घेईल. त्या मुलासोबत योग्य केले, असे देखील लिहिले आहे, अशा बऱ्याच कमेंट सध्या या व्हिडिओवर येत आहेत.


हेही पहा – मोदी म्हणाले, ‘सर्व काही छान आहे’ | ट्रम्प बघतच राहिले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -