घरट्रेंडिंगCoffee Machine: प्रेशर कुकर बनला कॉफी वेडिंग मशीन, पाहा सॉलिड देसी...

Coffee Machine: प्रेशर कुकर बनला कॉफी वेडिंग मशीन, पाहा सॉलिड देसी जुगाड

Subscribe

देसी कॉफी वेडिंग मशीन आणि त्यातून बनणारी लाजवाब कॉफी सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सोशल मीडियावर देसी जुगाडचे अनेक प्रयोग आपण पाहिले आहेत. मात्र सध्या व्हायरल होणारा देसी जुगाड कुठेही पाहिला नसले. आपल्याकडे चहा आणि कॉपी पिणाऱ्या अशा दोन लोकांचा गट आहे. चहा एखाद्या टपरीवरही उभं राहून पिता येतो. मात्र चांगली कॉफी पिण्यासाठी महागड्या कॅफेतच जाव लागतं. मात्र ग्वालियरमध्ये एका कॉफी विक्रेत्याने केलेला देसी जुगाड पाहून तुम्ही महागड्या कॉफी शॉप्सना रामराम ठोकाल. कॉफी तयार करण्यासाठी अनेक कॅफेमध्ये कॉपी वेंडींग मशीन असते. मात्र रस्त्यावर सायकरवर कॉफी विकणाऱ्या एका विक्रेत्याने थेट प्रेशर कुकरचा कॉफी वेडिंग मशीन म्हणून वापर केला आहे. सध्या या देसी कॉफी वेडिंग मशीन आणि त्यातून बनणारी लाजवाब कॉफी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

फूड व्लॉगर विशालने त्याच्या युट्यूबरवर हा प्रेशर कुकर कॉफीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ग्वालियरमध्ये एका रस्त्यावर एका व्यक्तीने सायकलवर कॉफी तयार करण्याचा सेटअप तयार केला आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती एका जारमध्ये दूध,कॉफी, साखर घेतो आणि त्यानंतर कॉफी तयार करण्यासाठी देसी जुगाड सुरू होतो. व्हिडिओमध्ये एक प्रेशर कुकर एका मशीनसोबत जोडला गेला आहे. या मशीनचा वापर जारमध्ये कॉफी तयार करण्यासाठी घेतलेले साहित्य एकत्र करण्यासाठी केला जातो. प्रेशर कुकरमधून येणारी वाफ एका स्टीलच्या पाइपचा वापर करुन कॉफी मिक्स करण्यासाठी केला जात आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यापासून या व्हिडिओला ५० हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. कॉफी वेंडींगसाठी वापरलेला प्रेशर कुकर पाहून सगळेच हैराण झालेत. त्याचप्रमाणे कॉफी तयार करण्यासाठी जुगाड करणाऱ्या कॉफी विक्रेत्याचे नेटकरी कौतुक करत आहेत.


हेही वाचा – Voting : बायकोचा फोटो Whatsapp स्टेटसवर ठेवणं पडलं महागात ; नवऱ्यावर गुन्हा दाखल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -