जिममध्ये होणाऱ्या तरुणांच्या मृत्युंवर सलमानचा मोलाचा सल्ला!

जिममध्ये जाणाऱ्या लोकांना योग्य माहिती नसल्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.

Salman Khan
अभिनेता सलमान खान

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमी चर्चेत असतो. एका मुलाखातीत सलमानने जिममध्ये जाणाऱ्या लोकांना महत्वाचा सल्ला दिला आहे. जिम करणाऱ्यांनी कशाप्रकारे शरिराची काळजी घेतली पाहिजे? हे त्याने सांगितले आहे.

सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जिमकडे आकर्षित होताना दिसत आहे. परंतु त्यांना जिमच्याबाबतीत योग्य माहिती नसल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. याआधी जिममध्ये झालेल्या दुखापतीचे व्हिडिओ सोशल मीडिया पाहायला मिळाले आहेत. योग्यरित्या जिम न केल्यास त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. या संदर्भात सलमानने जिमला जाणाऱ्या लोकांसाठी महत्वाची माहीती शेअर केली आहे.

सलमान म्हणाला की, जिमला जाणाऱ्या लोकांनी योग्य डाइट करणे महत्वाचे असते. तसेच वार्म अप केल्याशिवाय जिम करायला सरुवात करु नये. यामुळे तुमच्या शरिराला धोका निर्माण होऊ शकतो. दणकट शरीर मिळवण्यासाठी दुखापतीपासून दूर राहायला पाहिजे. शरिराला जेवढे झेपल तेवढेच वजन उचलले पाहीजे. जिम ट्रेनर काही वेळा तुम्हाच्याकडून अधिक जिम करुन घेतात. तुमचे शरिर थकले असेल तर, जिम करणे थांबवावे. जिम करणाऱ्या लोकांनी खेळ आणि आराम यांचाही डाइटमध्ये समावेश करावा. या गोष्टही अधिक महत्त्वाची आहे. तसेच ७० ते ८० टक्के डाइटवर लक्ष केंद्रीत करावे, असेही त्याने सांगितले.