घरट्रेंडिंग#MeToo - माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न, आलिया भटच्या आईचा खुलासा

#MeToo – माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न, आलिया भटच्या आईचा खुलासा

Subscribe

#metoo मोहीमेअंतर्गत अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांचा धक्कादायक खुलासा.

अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि जेष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनी #metoo मोहीमेबद्दल वाच्यता केली आहे. बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोकनाथ हे मद्यपान केल्यानंतर वाईट नजरेने बघतात असे राजदान यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलतांना त्यांनी हा खुलासा केला आहे. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ही आपल्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. बॉलिवूडमध्ये सुरु झालेली #metoo मोहीमेअंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे आपल्याला दिसतात आहे. बॉलिवूड अभिनेत्री लाईम लाइटमध्ये असल्या तरीही त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता होत नसल्याचे दिसून येते. मात्र आरोप न करणाऱ्या महिला या घाबरट नसल्याचे राजदान यांनी सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाल्या सोनी राजदान

“आलोकनाथ यांना मी मागील अनेक वर्षांपासून ओळखते. त्यांना मद्यपानाची सवय आहे. मद्यपान केल्यानंतर ते विचित्र वागतात. नशेत नसल्यावरच ते सर्वांशी नीट वागतात. मला त्यांच्या वागणूकीचा अनुभव आहे. मद्यपान केल्यावर ते वाईट नजरेने महिलांना बघतात. मी नशीवान आहे की माझ्यासोबत त्यांनी कधीही असभ्यवर्तन केलं नाही. अशा घटना बॉलिवूडमध्येच होतच असतात. माझ्या करियरच्या सुरुवातीला शुटिंगदरम्यान अतिप्रसंग करण्यात आला. माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी मी काहीच बोलले नव्हते. कारण बलात्कार करणाऱ्याचेही कुटुंब आहे. त्यालाही लहान मुले होते. त्या व्यक्तिशी मी कधीही संबध ठेवला नाही. झालेल्या घटनेबाबत वक्तव्य करून मी त्याच्या कुटुंबीयांना दुखावेल. त्यावेळी मी फक्त माझ्या रूममेट्सला सांगितले मात्र तक्रार केली नाही. आताच्या काळात जर माझ्यासोबत अशी घटना झाली तर मी त्याची तक्रार नक्कीच करेन.” – जेष्ठ अभिनेत्री सोनी राजदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -