Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग पठ्ठ्यानं Resume च्या स्किल्स बॉक्समध्ये लिहिले चक्क 'googling , मुलाखतकार चक्रावले

पठ्ठ्यानं Resume च्या स्किल्स बॉक्समध्ये लिहिले चक्क ‘googling , मुलाखतकार चक्रावले

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. रोज काहीना ना काही नवीन व्हायरल होत असतं आणि त्याला युजर्सही भरभरून प्रतिसाद देत असतात. यात जर काही मजेशीर ट्वीट असेल तर मग पाहायलाच नको. असेच एक मजेशीर ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येकालाचा इंटव्हूला जाताना आपल्या Resume मध्ये Education Information सह अन्य skills संदर्भात माहिती द्यावी लागते. असचं एकाने पठ्ठ्याने आपल्या Resume च्या skills बॉक्समध्ये Reading, Writing, Dancing सोडून चक्क ‘Googling’ म्हणजे ‘गुगलवर सर्च करता येते’ असं लिहिले आहे. या हटके स्किल्सची माहिती एका मुलाखतकर्त्याने आपल्या ट्विटरवर दिली. त्यामुळे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतं आहे.

या हटके ट्वीटची जोरदार चर्चा

कॅट मॅक जी नावाच्या ट्वीटर युजरने त्याच्याकडे मुलाखतीसाठी आलेल्या एका पठ्ठ्याच्या Resume बद्दलची माहिती ट्वीटरवर शेअर केली. यात त्याने लिहिले की, “आज मला एक CV मिळाला. या CV मध्ये त्या व्यक्तीने त्याच्या skills बॉक्समध्ये चक्क ‘googling’” असं लिहिले आहे. तर पुढे त्याने लिहिले की, “आम्ही त्याची मुलाखत घेणार आहोत.”

- Advertisement -

२३ जुलै रोजी शेअर केलेल्या या ट्वीटवर आत्तापर्यत २ हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट्सचा पूर आणला आहे. तर १८४ हजाराहून अधिक युजर्सने हे ट्वीट लाईक केले आहे. याशिवाय १३ हजाराहून अधिक युजर्सनी री-ट्वीट केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मेजेशीर Resume ची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक युजर्स त्यावर उलट-सुटल चर्चा करत आहेत.

- Advertisement -

एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, हा Resume पाहून तुम्हाला आश्चर्य वाटायला हवे, कारण अनेकांना व्यवस्थित गुगल करता येत नाही. मी गुगल्या तांत्रिक वापराबद्दल नाही तर योग्य कीवर्ड्सविषयी बोलतोयं. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, माझा Resume फक्त त्रासदायक आहे. खरतर तसं नाही तर मला जाणून घ्यायचे आहे की, माझा मुलाखतकर्ता माझा Resume किती बारकाईने वाचतो की नाही.

मुलाखतीनंतर मॅक जीने पुन्हा केले ट्वीट

या मजेशीर Resume पाठवणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेतल्यानंतर कॅट मॅक जी यांनी पुन्हा एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, उमेदवाराचा CV एकदम उत्तम होता. जर त्याने प्रतिसाद दिला तर होय! पण फक्त गुगल करण्याच्या स्कीलमुळे नाही तर त्याचा CV उत्तम होता म्हणून”


Bank Holiday in August 2021: बँकशी संबंधीत काम लवकर उरका! ऑगस्टमध्ये तब्बल १५ दिवस बँका राहणार बंद


 

- Advertisement -