घरट्रेंडिंगहो! 'तो' आहे खराखुरा स्पायडरमॅन

हो! ‘तो’ आहे खराखुरा स्पायडरमॅन

Subscribe

आत्तापर्यंत तुम्ही केवळ चित्रपटामध्येच स्पायडरमॅन पाहिला आहे. पण, तुम्हाला खरा स्पायडरमॅन पाहायला मिळाला तर? आता तुम्ही म्हणाल ते कसे शक्य आहे? हो, हे शक्य आहे! अगदी चित्रपटातल्या स्पायडरमॅनसारखा पोशाख नाही पण, अगदी माणसांप्रमाणे पोशाख केलेला स्पायडरमॅन तरी नक्की आहे! त्याला भेटायचे असेल तर मात्र तुम्हाला फ्रान्सची राजधानी पॅरिसला जावे लागेल.

कसा ठरला ‘तो’ खराखुरा ‘स्पायडरमॅन’!

- Advertisement -

रविवार दिनांक २७ मे २०१७ या दिवशीची ही थरारक घटना आहे. त्याचे झाले असे की, पॅरिसमधल्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर एक मुलगा लटकत होता. त्याला वाचवण्यासाठी म्हणा हवे तर, बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पण, प्रत्यक्षात मात्र त्याला वाचवायला कुणीच पुढाकार घेईना. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या २२ वर्षाच्या माकोउदोऊ गासामाला घटनेचे गांभीर्य कळले. गामासा अगदी चित्रपटातल्या स्पॉयडरमॅनला शोभेल असा चार मजले चढला. त्यानंतर गासामाने चौथ्या माळ्यावर लटकणाऱ्या मुलाला देखील वाचवले. काळजाचे ठोके चुकवणारे हे क्षण होते. या घटनेनंतर माकोउदोऊ गासामावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. शिवाय हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे. गासामाच्या धाडसाची कौतुक फ्रान्सचे अध्यक्ष इमेन्युल मैक्रॉन यांनी देखील घेतली असून, त्याला भेटीचे देखील आमंत्रण दिले आहे. शिवाय पॅरिसच्या महापौरांनी देखील गासामाची स्तुती केली आहे. गासामा हा सध्या फ्रान्समध्ये नोकरीच्या शोधात आहे.

चित्रपटातले सुपर हिरो हे चित्रपटांसाठीच मर्यादीत असतात. पण, माकोउदोऊ गासामा सारखे रिअल लाईफ सुपरहिरो मात्र अभावानेच सापडतात. माकोउदोऊ गासामाच्या धाडसाला ‘माय महानगर’चा सलाम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -