SSC Result 2021 : ‘त्या ०.०५ वाल्यांना विधान परिषदेत घ्या’ सोशल मीडियावर मिम्सचा महापूर

SSC Result 2021 10th class results updates funny trending memes viral on social media
SSC Result 2021 : 'त्या ०.०५ वाल्यांना विधान परिषदेत घ्या' सोशल मीडियार मिम्सचा महापूर

कोरोना संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या. यामुळे  इयत्ता ९ वी आणि आत्तापर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीचे अंतर्गत मूल्यमापन करत त्याआधारे इयत्ता १० वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा राज्यातील इयत्ता १० वीचा निकाल तब्बल ९९.९५ टक्के लागला आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाने जाहीर केली. यंदा जवळपास ९९. ५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर ०.०५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. या निकालावरून आता सोशल मीडियावर ‘एक से बढकर एक’ भन्नाट मिम्स व्हायरल होतायंत. निकाल जाहीर झाला असला तरी वेबसाईट ओपन होण्यास अनेक तांत्रिक अडचणी येतातयंत. यावरून आता युजर्स मिम्सच्या माध्यमातून संताप व्यक्त करतायंत.

 SSC Result 2021 funny trending memes viral on social media
काँग्रेस VS राष्ट्रवादी

वर्षभरात शाळांशी अजिबात संपर्क नसणारेच विद्यार्थीच यंदा अनुत्तीर्ण झाले आहेत. यात यंदाही दहावीच्या निकालात   मुलींनी बाजी मारील आहे तर ९५७ विद्यार्थ्यांनी शंभर नंबरी कामगिरी केली आहे.

 SSC Result 2021 funny trending memes viral on social media
काय बरं पोरं असतील

राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यींनीचा निकाल ९९.९६ टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे.

 SSC Result 2021 funny trending memes viral on social media
का करावं या कारट्यांचं

निकाल पाहण्याच्या उत्सुकतेने एकाचवेळी अनेक विद्यार्थ्य्यांनी बोर्डाची ऑनलाईन वेबसाईट ओपन केली. यामुळे ही वेबसाईट आता सुरु होण्यास अडचणी येतातयं. यामुळे अनेक विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. असे असतानाही सोशल मीडियावर मात्र १० वीच्या निकालावरून मिम्सचा जणू महापूर आलायं.

 SSC Result 2021 funny trending memes viral on social media
पोरांनी पोरींना टफ फाईट दिलीयं

निकाला लागण्यास उशीर होत असल्याने सध्या ट्वीटरवर गोलमाल चित्रपटातील ‘अब तक तो उसको आ जाना चाहियेता!’ अशा आशयाचे मिम्स व्हायरल होतायंतय, यात जवळपास सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असताना ०.०५ टक्के पोरं नक्की कोण आहेत जी एवढी सूट देऊनही नापास झालेत? यावरून अनेक भन्नाट मिम्स तयार केले जातायंत.

SSC Result 2021 funny trending memes viral on social media
९ वीचे विद्यार्थी म्हणतायंत येई द्या तिसरी लाट

त्यामुळे ‘०.०५ टक्के नापास मुलांना सरळ विधानपरिषदेत पाठवां’ अशा आशयाचे मिस्म सध्या जोरदार व्हायरल होतयं. तर ‘हा निकाल आहे की डेटॉल साबन’ असा मिश्किल प्रश्न मिम्समधून विचारला जातोयं. त्यामुळे फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्रामपासून सर्वच सोशल मीडियावर साईट्सवर १० वीच्या निकाल पाहून खिल्ली उडवली जातेयं.

SSC Result 2021 funny trending memes viral on social media
नापास झालेल्यांना विधानपरिषदेत घ्या.

SSC Result 2021 Maharashtra Board: यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी