घरट्रेंडिंगSurya Grahan 2023 : एप्रिल महिन्यात असणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण

Surya Grahan 2023 : एप्रिल महिन्यात असणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण

Subscribe

वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी असेल. हे सकाळी 7.45 पासून सुरु होईल आणि दुपारी 12.29 पर्यंत राहिल

2023 मध्ये एकूण 4 ग्रहण असणार आहेत. ज्यात 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असतील. 20 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. खगोलशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. वास्तविक, सूर्य चंद्राच्या मागे लपतो आणि त्यामुळे काही काळ अंधार असतो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी धर्म आणि ज्योति षशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. तसेच ग्रहणाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी असेल. हे सकाळी 7.45 पासून सुरु होईल आणि दुपारी 12.29 पर्यंत राहिल. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर, दक्षिण आशिया, पॅसिफिक महासागर आणि पूर्व आशियामध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र, सूर्यग्रहण जरी भारतात दिसत नसल्यामुळे त्याचा सुतक काळ पाळण्याची आवश्यकता नाही.

- Advertisement -

सूर्यग्रहण म्हणजे काय?

वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. अशा स्थितीत चंद्रामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. हे नेहमी अमावस्येलाच होते.

- Advertisement -

15 दिवसांनी असणार चंद्रग्रहण

Chandra Grahan: 5 मई को होगा चंद्र ग्रहण, सभी राशियों पर यह असर होगा

वर्षातील पहिले चंद्रग्रहण सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी आहे. हे ग्रहण 5 मे रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण उपछाया चंद्रग्रहण असेल. उपछाया चंद्रग्रहण सामान्यतः उघड्या डोळ्यांना दिसत नाही. उपछायाग्रहणातही सुतक कालावधी मान्य नसतो. या चंद्रग्रहणानंतर वर्षभरात आणखी दोन ग्रहणे होतील. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार आहे. दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी आणि वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

 


हेही वाचा :

दुर्मीळ योग : रामनवमीपासून ‘या’ 3 राशींच्या लोकांना मिळणार चिक्कार पैसा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -