घरट्रेंडिंगTruecaller ला स्वदेशी अॅप Bharat Caller देणार टक्कर!

Truecaller ला स्वदेशी अॅप Bharat Caller देणार टक्कर!

Subscribe

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असणाऱ्या कॉलर आयडी अॅप Truecaller शी स्पर्धा करण्यासाठी भारतीय कॉलर आयडी अॅप लाँच करण्यात आले आहे. या स्वदेशी कॉलर आयडीचे नाव भारतकॉलर असे आहे. ज्या अभियंत्यांकडून हे अॅप तयार करण्यात आले आहे, त्यांनी असा दावा केला की, हा कॉलर आयडी आपले कॉल लॉग, संपर्क किंवा संदेश त्यांच्या सर्व्हरवर जसे परदेशी आणि इतर कॉलर आयडी अपलोड करत नाही. यासह तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्या फोन नंबरच्या डेटाबेसमध्ये एक्सेस करण्याचा देखील अधिकार नाही. भारतकॉलरला तयार करणारे अभियंता आणि आयआयएम बेंगळुरूचे माजी विद्यार्थी प्रज्वल सिन्हा यांनी असे सांगितले की, हे अॅप देशातील ट्रूकॉलरला पर्याय बनून टक्कर देऊ शकते. हे पूर्णपणे सुरक्षित असून किकहेड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, उद्योजक कंपनीने हे अॅप तयार केले आहे. आपल्या कॉल रेकॉर्ड, मॅसेज किंवा कॉन्टेक्ट डेटा जतन करून ठेवत नाही. हे अॅप प्ले स्टोअर आणि iOS वर उपलब्ध आहे. कोणीही ते विनामूल्य डाउनलोड करू शकते. आतापर्यंत हे अॅप 6000 वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

हे स्वदेशी अॅप्लिकेशन तयार करण्यामागचा सर्वात मोठा हेतू म्हणजे भारतीय कॉलर आयडी अॅप लॉंच करणे असा असल्याचे अभियंताने सांगितले. तसेच, आमच्या टीमला वाटले की या क्षणी कॉलर आयडीच्या बाबतीत भारतीय नसलेले अॅप्स खूप जास्त आहेत. आतापर्यंत कोणतेही भारतीय कॉलर आयडी अॅप तयार झाले नाही जे अगदी पूर्णपणे यशस्वी झाले आहे किंवा ट्रूकेलर सारखी चांगले फीचर्स युजर्सना देत आहेत. यानंतर प्रज्वल आणि त्याचा मित्र या दोघांनी भारतकॉलर अॅप बनवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हे कॉलर आयडी कसे कार्य करते यावर दोघांनी साधारण ३ महिने संशोधन केले. यानंतर, डिसेंबर २०२० मध्ये, भारत कॉलर बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सुरूवात केली. ते बनवण्यासाठी सहा महिने लागले. यानंतर, त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या, आणि त्या खूप यशस्वी झाल्यात. पहिलं व्हर्जन १० मिलियन युजर्सच्या वापरण्यासाठी डिझाइन केले आहे. भारतकॉलर १५ ऑगस्ट २०२१ रोजी सामान्य लोकांसाठी लॉंच करण्यात आले आहे. स्वदेशी भारतकॉलर पूर्णपणे ट्रूकॉलरसारखे तयार करण्यास एक महिना लागणार असल्याचे प्रज्वलने सांगितले. सध्या या अॅप्लिकेशनमध्ये सतत अपडेट केले जात असून कॉलरआयडीशी संबंधित एआय आधारित अल्गोरिदमची चाचणी केली जात आहे. तसेच हे अॅप अनेक भाषांमध्ये लॉंच करण्यात आले आहे. जेणेकरून भारतीय नागरिक त्यांच्या संबंधित भाषेत हा कॉलर आयडी वापरू शकतील.


लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -