घरट्रेंडिंगबाँब फेकणारे 'आरएसएस' दहशतवादी - स्वरा भास्कर

बाँब फेकणारे ‘आरएसएस’ दहशतवादी – स्वरा भास्कर

Subscribe

गेल्या अनेक शतकांपासून केरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नव्हता. मात्र, अखेर बुधवारी ही प्रथा मोडीस निघाली आणि महिलांनी शबरीमालामध्ये प्रवेश केला.

महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश केल्यामुळे केरळमध्ये सध्या केरळात तणावपूर्ण वातावरण आहे. महिलांच्या प्रवेशाचा निषेध म्हणून ठिकठिकाणी आंदोलनं आणि निदर्शन केली गेली. अशाच हिंसक आंदोलनादरम्यान काही लोकांनी  केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस स्टेशनवर ४ गावठी बॉम्ब फेकले. हा बॉम्ब हल्ला करणारे आरएसएसशी (RSS) संबंधित असलयाचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने याच वृत्ताचा दाखला देत सोशल मीडियावरुन आरएसएसवर निशाणा साधला आहे. स्वराने ट्वीटरवरुन अत्यंत परखड शब्दात आरएसएसवर टीका केली आहे. ‘पोलीस ठाणे किंवा अन्य कुठेही बाँब फेकणारे दहशतवादीच आहेत. हा भगवा दहशतवाद असून, यांनासुद्धआ फाशीची शिक्षा होणार का?’ असा प्रश्न तिने ट्वीटरद्वारे उपस्थित केला आहे. गेल्या अनेक शतकांपासून केरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नव्हता. महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी अनेक लोकांनी, समित्यांनी आंदोलनं केली. अखेर बुधवारी ही प्रथा मोडीस निघाली आणि महिलांनी शबरीमालामध्ये प्रवेश केला. ज्याविरुद्ध आता केरळामध्ये हिंसक आंदोलनं केली जात आहेत.

- Advertisement -

बुधवारी पहाटे दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. यामुळे वर्षांपासून चालत आलेली रित, परंपरा बदलली आणि एक नवीन इतिहास घडला. मात्र, दुसरीकडे या घटनेचे उलट परिणाम होऊ लागले. सध्या याच मुद्द्यावरुन केरळ राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. आतापर्यंत कन्नूर, पेराम्ब्रा, मलापुरम, अदूर येथे हिंसक आंदोलनं झाली आहेत.शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळीही या परिसरांत काही हल्ले झाले. दरम्यान, या तणावपूर्ण वातावरणामुळे कन्नूर तसंच राज्यातील इतर भागात राज्याचे पोलिस प्रमुख लोकनाथ बेहेरा यांनी राज्यव्यापी सतर्कता इशारा दिला आहे. या हिंसाचारामुळे त्या-त्या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -