T20 WC : भारत V/S पाकिस्तान आज ‘महासंग्राम’ विजयाबद्दल कर्णधार कोहलीला विश्वास….

T20 WC: India vs Pakistan match virat kohli confident to win india today
T20 WC : भारत V/S पाकिस्तान आज 'महासंग्राम' विजयाबद्दल कर्णधार कोहलीला विश्वास....

भारतीय संघ आयसीसी विश्वकप स्पर्धेतील आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरूध्द खेळणार आहे. रविवारी सायंकाळी ७.३० वाजता दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सामन्याला सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ ग्रुप ‘ब’ मध्ये आहेत. आतापर्यंत पाकिस्तानला विश्वचषकात भारताचा पराभव करता आला नाही. आजच्या सामन्यात देखील हाच विक्रम कायम ठेवण्याचे आव्हान भारतीय संघाला असणार आहे. भारतीय संघात ५ फलंदाज, ३ अष्टपैलू, आणि ३ गोलंदाजांचा समावेश आहे. या महालढतीच्या अगोदर कर्णधार विराट कोहलीने” आम्ही सामना जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

एम. एस. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ मध्ये पहिला टी ट्वेंटी विश्वकप जिंकला होता. पण त्याच्या नंतर भारतीय संघ विश्वकपच्या किताबापासून वंचित राहिला आहे. विश्वकप सुरू होण्याच्या अगोदरच विराट कोहलीने माहिती दिली आहे की, के. एल. राहुल आणि रोहित शर्मा हे सलामीवीर म्हणून पारीची सुरूवात करतील. संघाकडे पर्यायी फलंदाज म्हणून ईशान किशन आहे, किशनला इग्लैंड विरूध्दच्या सामन्यात संधी मिळाली होती.

कर्णधार विराट कोहलीच्या खेळीवर सर्वांचे लक्ष लागले आहे, कर्णधार कोहलीला २०१४ आणि २०१६ च्या टी ट्वेंटी विश्वचषकात ‘ मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला होता. जगातील सर्वश्रेष्ठ टी ट्वेंटी फलंदाजीच्या यादीत विराटचे स्थान खूप वेळ पहिल्या क्रमांकावर राहिले होते, सध्या तो चौथ्या क्रमांकावर आहे.

धोनीच्या अनुभवाचा संघाला होणार फायदा

एम.एस.धोनी भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून सुध्दा त्याची ओळख आहे. धोनीच्या कामगिरीचा आणि अनुभवाचा संघाला फायदा व्हावा म्हणून BCCIने धोनीची संघाच्या मेंटॉर पदी निवड केली आहे. संघाचे कोच रवी शास्त्री चालू विश्वचषकादरम्यान आपल्या प्रशिक्षक पदावरून माघार घेणार आहेत, सोबतच त्यांचे सहकारी फलंदाजीचे कोच विक्रम राठौर, गोलंदाजीचे कोच भरत अरूण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : T20 WC : Ind vs Pak High Voltage सामन्याचे असे पहा लाइव कव्हरेज