घरट्रेंडिंगWork From Homeचं बरं! 82 टक्के कर्मचारी म्हणतात आम्हाला ऑफिसलाच यायचं नाही...

Work From Homeचं बरं! 82 टक्के कर्मचारी म्हणतात आम्हाला ऑफिसलाच यायचं नाही – रिसर्च

Subscribe

या अभ्यासात सहभागी झालेल्या 64 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होम करताना त्यांची प्रोडक्टिव्हीटी जास्त असते त्याचप्रमाणे ताण ही कमी असतो. या अभ्यासात 80टक्के एचआरने सांगितले की, आता ऑफिसमध्ये येऊन काम करणारे कर्मचारी शोधणे कठीण झाले आहे.

कोरोना महामारीने सर्वांची लाइफ स्टाइल पूर्णपणे बदलून टाकली. शाळा फोनवर ऑनलाइन सुरू झाल्या तर ऑफिस थेट घरात आलं. वर्क फ्रॉम फोमला ( Work From Home)  सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला वर्क फ्रॉम करणे फार कठीण आणि कटकटीचे वाटत होते मात्र आता लोकांना वर्क फ्रॉम आपलसं वाटायला लागल आहे. ऑफिसला जाण्यापेक्षा घरी बसून काम करण्याला लोक सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. जॉब साइट साइकीच्या टँलेंट टेक आउटलूकच्या रिपोर्टनुसार, कोरोना काळात वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांवर लादण्यात आले होते. मात्र आता 2 वर्षांनी वर्क फ्रॉम फोम हे कर्मचाऱ्यासाठी न्यू नॉर्मल सर्वसामान्य बाब बनली आहे. कोरोनाच्या काळात लागलेल्या नवीन सवयींपैकी ही एक सवय होती आणि या नवीन सवयीने लोकांच्या जीवनात स्थान मिळवले आहे. टँलेंट टेक आउटलूकने केलेल्या रिसर्चमध्ये 82 टक्के लोकांना वर्क फ्रॉम होमच बरे, आम्हाला ऑफिसला यायचं नाही असे म्हटले आहे.

- Advertisement -

टँलेंट टेक आउटलूकने 2022 मध्ये 100 हून अधिक एक्झिक्यूटीव्ह आणि एचआर अधिकाऱ्यांकडून मिळवलेल्या प्रतिक्रीयांचे विश्लेषण केले. सोशल मीडियाद्वारे हे विश्लेषण केले गेले. या अभ्यासात सहभागी झालेल्या 64 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होम करताना त्यांची प्रोडक्टिव्हीटी जास्त असते त्याचप्रमाणे ताण ही कमी असतो. या अभ्यासात 80टक्के एचआरने सांगितले की, आता ऑफिसमध्ये येऊन काम करणारे कर्मचारी शोधणे कठीण झाले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात नव्या गोष्टींची सवय झाली आहे. घरुन काम करणे हा नवा पर्याय आता सर्वसामान्य झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात कंपन्या आता कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होमचीच अपेक्षा करत आहेत. जे कर्मचारी हे स्वीकारत नाही त्यांना त्यांच्यात चांगले टॅलेंट असूनही आव्हानांना समोरे जावे लागत आहे.

 

सायकीचे संस्थापक आणि सीईओ करुणजीत कुमार धीर यांनी म्हटले आहे की, 2 वर्ष एकमेकांपासून लांब राहून काम केल्याने एक नवीन गोष्ट साध्य झाल्या आहेत ज्या कर्मचारी आणि कंपन्या या दोघांसाठी फायदेशीर आहेत.


हेही वाचा –  रेड वाइन प्यायल्याने कोरोना संक्रमणाचा धोका 17 टक्क्यांनी कमी ; संशोधनातून माहिती समोर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -