कोरोनाचा आत्मा तुमच्यात आणि तुमचा आत्मा बाहेर, तात्या विंचूचा नागरिकांना इशारा

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामध्ये नागरिकांना सावध करण्याचा इशारा देताना तात्या विंचूचा नवीन व्हिडिओ झाला व्हायरल.

tatya vinchu is back to remind to stay safe during corona virus scare
कोरोनाचा आत्मा तुमच्यात आणि तुमचा आत्मा बाहेर, तात्या विंचूचा नागरिकांना इशारा

कोरोनाचा प्रसार हा सगळीकडे वाढताना दिसत आहे. लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. कित्येक जण मास्क न लावता, गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अशा लोकांनसाठी तात्याविंचूने धोक्याचा इशारा दिला आहे. पावरी करु नका. कोरोना वाढतोय असे तात्या विंचू सांगतो आहे. प्रसिद्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि सत्यजित पाध्ये यांचा तात्या विंचूचा बाहुला खूप लोकप्रिय आहे. या तात्याविंचूचा एक व्हिडिओ सत्यजीत पाध्ये यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘पावरी’चा धुमाकूळ पाहायला मिळतो आहे. त्याचाच आधार घेवून तात्या विंचू या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना काहीतरी सांगताना दिसतोय.तात्या विंचू मनोरंजनाबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करतो. सामाजिक संदेश घेऊन आपल्या भेटीला येतो. गेल्या वर्षीही मार्च महिन्यात तात्या विंचूने कोरोनाबाबत जागृती केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आता तो संदेश घेऊन आला आहे.

तात्या विंचूच्या या व्हिडिओमध्ये तात्या म्हणतोय की, नमस्कार मी तात्या विंचू, ये हमारी ‘पावरी’ हो रही है. कोरोनाच्या केसेस वाढत चालल्या आहेत. वॅक्सिन आली तरी पार्टी करुन गर्दी करु नका. नाहीतर कोरोनाचा आत्मा तुमच्यात आणि तुमचा आत्मा बाहेर. ओम फट स्वाहा,. असे म्हणून तात्या विंचूने कोरोनाविषयक जनजागृतीसाठी नागरिकांना इशारा दिला आहे.