घरट्रेंडिंगचहा पिता-पिता कपही खा! कोल्हापूरच्या इंजिनियर्सची भन्नाट आयडीयाची कल्पना

चहा पिता-पिता कपही खा! कोल्हापूरच्या इंजिनियर्सची भन्नाट आयडीयाची कल्पना

Subscribe

राज्यात चहाप्रेमींची कमी नाही. चहाप्रेमींची कमी नसल्याने प्रत्येक शहरा-शहरातील गल्ली बोळ्यात चहाच्या टपऱ्या किंवा दुकानं देखील मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र कोल्हापूरमध्ये मिळणाऱ्या चहाने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. बिस्किट कप किंवा एडिबल कटलरी कप्समधून मिळणाऱ्या चहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसतेय. बिस्किट कप किंवा एडिबल कटलरी कप्स हे खाण्याच्या घटकापासून तयार केल्याने ते कप देखील चहा पिता-पिता खाता येणार आहे.

दरम्यान कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर तरुणांनी लढवलेली खाण्यायोग्य चहाच्या कप्सची शक्कल कचरा कमी करण्यास वापरली असून त्यांची ही आयडीया कचरा कमी करण्यास नक्कीच हातभार लावणारी असल्याचे म्हटले जात आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,कॅफे, चहाची टपरी, कॉफीची दुकानं याठिकाणी होणारा कप्सचा कचरा कमी होण्यास मदत होत आहे. प्लॅस्टिक आणि कागदी कप्ससाठी हे बिस्किट कप किंवा एडिबल कटलरी कप्स एक उत्तम पर्याय ठरत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तरुण इंजिनिअर्सनी खाता येणाऱ्या बिस्किट कपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दिग्विजय यांच्या डोक्यात ही कल्पना आली होती आणि ती त्यांनी सत्यात देखील आणली. हैदराबाद आणि गुजरातमध्ये मिळणारे त्यांनी खाण्यायोग्य चमचे आणि कप्स मागवले. दीड वर्ष त्याबाबतीत रिसर्च केला आणि कोल्हापूरातही हा उपक्रम करता येईल, असे त्यांनी ठरवले. हैदराबादमधून त्यांनी हे मशिन बनवून घेतले आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी या कल्पनेला विशेष वेळ दिला. जानेवारीपासून त्यांनी इतर दोन मित्रांच्या मदतीने या खाण्यायोग्य कप्सची निर्मिती सुरू केली. शहरातील विविध कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफे याठिकाणी त्यांचे कप्स पुरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -