घरट्रेंडिंगTeddy Day 2021: पार्टनरला टेडी द्यायचाय? वाचा कोणत्या टेडीचा काय आहे अर्थ!

Teddy Day 2021: पार्टनरला टेडी द्यायचाय? वाचा कोणत्या टेडीचा काय आहे अर्थ!

Subscribe

टेडी बिअर गिफ्ट करताना रंगाचा अर्थ जाणून घ्या

सध्या प्रेम करणाऱ्या प्रेमिकांचे सेलिब्रेशन सुरु आहे. म्हणजेच काय तर प्रेयसी, प्रियकर व्हॅलेटाईन डे वीक(Valentine Week) सेलिब्रेट करत आहे. प्रेमाचा हा आठवडा हा विविध दिवसांनी नटलेला आहे. त्यातील प्रत्येक दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे. यामध्ये १० फेब्रुवारी २०२१ हा चौथा दिवस लव्हबर्डस ‘टेडी डे’ (Teddy Day 2021) म्हणून साजरा करतात. विशेष म्हणजे प्रियसीला टेडी बिअर खूप आवडत असेल तर प्रियकर खास टेडी प्रियसीला देण्यासाठी धडपड करत असतो. आपल्या पार्टनरप्रति (Partner) असणाऱ्या प्रेमाचे, भावनांचे प्रतिक म्हणून ‘टेडी बिअर’ गिफ्ट केले जाते. परंतु हे ‘टेडी बिअर’ (Teddy Bear Gift) गिफ्ट करण्याआधी टेडी बिअरच्या रंगामागचा अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे. या खास दिवशी आपण प्रत्येक रंगाच्या टेडी बिअरचा अर्थ आपण जाणून घेऊयात…

 

- Advertisement -

प्रत्येक रंगाच्या टेडी बिअरची वेगळी ओळख (Teddy Bear Color Significance).

1. Blue Teddy Bear- निळ्या रंगाच्या टेडी बिअरचा अर्थ आहे अतुट प्रेम. निळ्या रंगाचा टेडी बिअर जर तुम्हाला गिफ्ट मिळाला तर तुम्ही खूप लकी असाल. निळ्या रंगाचा टेडी बिअर दर्शवतो की तुमच्या पार्टनरचे खूप प्रेम आहे.

 

- Advertisement -

2. Green Teddy Bear- हिरव्या रंगाच्या टेडी बिअरचा अर्थ तुम्ही प्रिय व्यक्तीची वाट पाहत आहात. हिरवा रंग हा निसर्ग (Nature) आणि ताजेपणाशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्हालाही हिरव्या रंगाचा टेडी बिअर मिळाला तर तुमचा पार्टनर कोणत्याही परिस्थीतमध्ये तुमची वाट बघत पाहत राहिल.

3. Red Teddy Bear- लाल रंगाचा टेडी बिअर हा खऱ्या प्रेमाचे प्रतिक (Love Proposal) आहे. लाल रंगाचा टेडी बिअर कधी न संपणाऱ्या प्रेमाचे आणि अगदी मनापासून केलेल्या प्रेमाचे रुप दर्शवतो. त्यामुळे लाल रंगाचा टेडी खास करुन व्हॅलेंटाईनला प्रेमीयुगल एकमेकांना देतात.

4. Pink Teddy Bear- गुलाबी रंगाच्या टेडीचा अर्थ प्रियकर प्रियसीचे एकमेकांवर खूप प्रेम करतात असा आहे.

5. Orange Teddy Bear- नारंगी रंगाच्या टेडी बिअर म्हणजे आनंद, आशा, अपेक्षा, आणि तीव्र उष्णतेचे प्रतिक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला जगातील सर्व सुख, आनंद देण्यासाठीचे प्रतिक म्हणून एक सुंदर टेडी बिअर देऊ शकता.

6. White Teddy Bear- सफेट रंगाचा टेडी एक विशेष संदेश देत असतो. तो म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरसह खऱ्या प्रेमाप्रति पहिल्यापासूनच वचनबद्ध (Committed) आहात.

7. Yellow Teddy Bear- पिवळ्या रंग सकारात्मकतेचे प्रतिक आहे. परंतु व्हॅलेंटाईन डेला पिवळ्या रंगाचा टेडी देणे चांगले नसते असा म्हणतात. टेडीचा हा रंग असे दर्शवतो की तुमचा पार्टनर तुमच्याशी ब्रेकअप (Breakup) करु पाहतोय.

8. Brown Teddy Bear- ब्राऊन रंगाचा टेडीचा अर्थ तुमच्यामुळे तुमच्या प्रियकराचे मन दुखावले गेले आहे. त्यामुळे तुमच्या नात्यात जर भांडणे होत असतील तर तुम्ही ब्राऊन रंगाचा टेडी पार्टनरला देऊ शकता.

9. Black Teddy Bear- जर तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून काळ्या रंगाचा टेडी बिअर तर समजून जा त्याने तुमचे प्रपोजल रिजेक्ट केले आहे. तसेच तो आधीपासूनच कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये (Relationship) आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -