घरट्रेंडिंगभयंकर, विमानाच्या लँडिंग गियरला चिकटून तरुणाने केला लंडन ते पोलंड प्रवास, सुदैवाने...

भयंकर, विमानाच्या लँडिंग गियरला चिकटून तरुणाने केला लंडन ते पोलंड प्रवास, सुदैवाने वाचला जीव

Subscribe

वेगवेगळ्या युक्त्या लढवून विमानात प्रवास केल्याचे आपण पाहिले आणि ऐकले आहे. आता एका १६ वर्षाच्या मुलाने विमानाच्या खालच्या भागात असलेल्या लँडिंग गियरमधून प्रवास केल्याचे समोर आले आहे. लंडनवरून उड्डाण झाल्यानंतर जेव्हा विमान नेदरलँड्सच्या होलँडला पोहोचले तेव्हा एअरपोर्ट स्टाफने लँडिंग गियर जवळ मुलगा असल्याची माहिती मिळाली. जवळपास १९ हजार उंचावर असल्याने आणि खूप थंडीने मुलगा हायपोथर्मियाचा शिकार झाला होता. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

डच न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाने जवळपास ५१० किमी लँडिंग गियरला चिपकून प्रवास केला आहे. होलँडच्या मास्ट्रिच्ट एअरपोर्टवर विमान लँडिंग केल्यानंतर त्या मुलाला उतरवले. माहितीनुसार, मुलगा तुर्की एअरलाइन्सच्या कार्गो विमान लँडिंग गियरला चिपकला होता. एक दिवसापूर्वी हे विमान केन्यापासून इस्तांबुल ते लंडन पोहोचले होते. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक आधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘ते या घटनेचे तपासणी करतील की, हे मानव तस्करीचे प्रकरण नाही आहे की नाही.’

- Advertisement -

मास्ट्रिच्ट एअरपोर्टच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ‘मुलगा खूप नशिबवान होता. अशाप्रकारे प्रवास करूनही तो जिवंत राहिला. यापूर्वी काहीवेळा लोकांनी लँडिंग गियरला चिपकून प्रवास केल्याची घटना समोर आली आहे, पण अनेक वेळा यामुळे लोकांचा जीव गेला आहे.’


हेही वाचा – Video: बाप रे बाप! त्याच्या अंगावर पडले ढीगभर साप

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -